Ncp Farmer Leader Shankar Dhondge Sarkarnama
मराठवाडा

Budget :शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणाऱ्या पंतप्रधानांच्या आश्वासनाला अर्थसंकल्पात हरताळ

खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवणार म्हणजे बाहेर देशातून तेलबिया आयात करून येथील उत्पादक शेतकऱ्यांना किमान किंमत मिळू देणार नाही असा होतो. ( Ncp Leader Shankar Dhondge)

सरकारनामा ब्युरो

नांदेड : केंद्र सरकारकडून आज मांडला गेलेला अर्थसंकल्प हा पूर्णपणे शेतकऱ्यांना व शेती क्षेत्राला नाकारणारा अर्थसंकल्प आहे. (Budget) विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Pm Modi) यांनी सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करू असे आश्वासन दिले होते, त्या घोषणेचे प्रतिबिंब किंवा साधा उल्लेखही अर्थमंत्र्याच्या भाषणात नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते व राष्ट्रवादी (Ncp) किसान सभेचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतांनाच मराठवाड्यातील शेतकरी नेते व राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष शंकर धोंडगे यांनी मात्र हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांनी निराशा करणारा असल्याचे म्हटेले आहे.

धोंडगे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन दुप्पट करू असे आश्वासन दिले. असे असताना त्या घोषणेचे प्रतिबिंब किंवा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही. उलट शेतमालाचा उत्पादन खर्च आता दोनवर्षात दुप्पट झाला. खाद्य तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवणार म्हणजे बाहेर देशातून तेलबिया आयात करून येथील उत्पादक शेतकऱ्यांना किमान किंमत मिळू देणार नाही असा होतो.

यावेळी केंद्र सरकारच्या वित्तमंत्र्याचा भर हा नैसर्गीक शेती, सेंद्रीय शेती , झीरो बजेट शेती , वनशेती यावर जास्त दिसत होता. म्हणजे शेती क्षेत्रात नविन संशोधने, विज्ञान तंत्रज्ञान याला फाटा मारत भारतीय शेती मध्ययुगीन काळाकडे नेण्याचा इरादा केंद्र सरकारचा दिसतो. शेती व्यवसायातील समृद्धी व प्रगती जगाबरोबर नेण्याचा कोणताही मानस दिसत नाही.

खरेतर मागील दोन वर्षाच्या कोव्हीड संकटात देशाच्या अर्थसंकल्पाला शेती क्षेत्राने तारण्याचे काम केले आहे. असे असताना शेती व शेतकऱ्यांबद्दल सरकारची नकारात्मक भूमिका का आहे? असा सवालही धोंडगे यांनी केला. हे देशाला घातक ठरेल, असा धोक्याची इशारा देखील त्यांनी या निमित्ताने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT