Ashok Chavan And Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

पोटनिवडणूक चव्हाणांसाठी प्रतिष्ठेची, तर भाजप पंढरपूर फार्म्युल्याच्या तयारीत..

(Deglur-Biloli By Election) चव्हाण यांनी अंतापूरकर यांच्या मुलाची उमेदवारी (Ashok Chavan) जवळपास निश्चित केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मराठवाड्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ही निवडणूक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात असून तीन पक्षाच्या महाविकास आघाडीतील समन्वयाची कसोटी या निमित्ताने लागणार आहे. तर भाजप पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा फार्म्युल्याची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे.

चव्हाण यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे नुकतेच कोरोना साथीने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. काँग्रेस पक्षासाठी सुद्धा या पोटनिवडणुकीचे वेगळे महत्व आहे.

चव्हाण यांनी अंतापूरकर यांच्या मुलाची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. राज्यात शिवसेना,राष्ट्रवादी आणी काँग्रेस या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. तरीही या मतदार संघातून शिवसेनेचे तीनवेळा आमदार राहिलेले सुभाष साबणे हे तुल्यबळ उमेदवार मानले जातात.

महाविकास आघाडी असल्यामुळे साबणे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवणे संभव नसल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून त्यांनी उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले जाते. या पोटनिवडणुकीत ते भाजपकडू उमेदवार असण्याची दाट शक्यता असत्यामुळे ही पोटनिवडणूक तुल्यबळ लढतीची होणार आहे.

भाजप या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपशकून घडवण्याच्या प्रयत्नात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला अपशकून घडवला होता.राष्ट्रवादीचे भारत भालके यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेतून आलेल्या समाधान अवताडे यांना उमेदवारी देऊन निवडूण आणले. नेमका तोच फार्म्युला भाजपने देगलूर पोटनिवडणुकीसाठी अवलंबला आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

१ ऑक्टोबर रोजी नोटिफिकेशन्स काढले जाईल, ८ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्रे भरण्याची शेवटची तारीख. ११ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी व १३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ३० आॅक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होईल. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT