Manvat Market Committee News
Manvat Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Manvat Market Committee : उमेदवाराचे निधन, मानवत बाजार समितीची निवडणूक रद्द..

राजेश काटकर

Marathwada : मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Manvat Market Committee) निवडणुकीत सहकार्य सेवा संस्था मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराचे शुक्रवारी निधन झाले. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांनी दिले आहेत.

मानवत बाजार समितीच्या १८ संचालकासाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. (Marathwada) अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर २१ एप्रिल रोजी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप होणार होते. (Parbhani) मात्र मानवत तालुक्यातील मंगरूळ येथील उमेदवार रावसाहेब कदम यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात अर्ज दाखल केला होता.

मात्र २१ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास कदम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. (Maharahstra) निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे निधन झाल्याने निवडणूक प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी वीजभज प्रवर्गातून निवडणूक लढवीत असलेले उमेदवार गणेश नाईक यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जयंत पाठक यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली होती.

यानंतर निवडणूक प्रक्रियेचे काय होणार? निवडणुकीला स्थगिती मिळणार का? अशी चर्चा राजकीय वतुर्ळात सुरू होती. मंगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयाकडून २२ एप्रिल रोजी निधन झालेल्या उमेदवाराचा मृत्यू दाखला प्रमाणपत्र आणि अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आज निवडणूक निर्णय अधिकारी पाठक यांनी २८ एप्रिल रोजी बाजार समितीसाठी होणारी मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे आदेश काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT