Market Committee : केंद्रासह राज्यात सत्तेचा कसा गैरवापर होत आहे, याचा अनुभव प्रत्येकजण घेत आहे. (Kannad APMC Election) जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक गोष्टीला कर लावून महागाई वाढली आहे. जनता आता खोकेंच्या धनशक्तिला या निवडणूकीत जनशक्तीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी व्यक्त केला.
मतदारांनी अफवा आणि आर्थिक आमिषाला बळी न पडता, आपल्या कामी कोण येईल, ते पाहूनच मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. (Kannad) कन्नड बाजार समितीच्या प्रचारा दरम्यान, मतदारांशी संवाद साधतांना राजपूत (Udaysingh Rajput) यांनी राज्यातील सरकारवर टीका केली.
राजपूत म्हणाले, बाजार समितीची निवडणूक ही खोके सरकारच्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. (Shivsena) विरोधकांनी धनाढ्य उमेदवार दिले आहेत, तर आम्ही शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला आशीर्वाद द्या, आणि सगळ्या उमेदवारांना विजयी करा.
कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा विजय निश्चित असून, भांडवलदार आणि कंत्राटी नेत्यांनी कन्नड बाजार समिती भकास केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या विरोधकांना बाजार समितीतून हद्दपार करा, असे आवाहनही आमदार राजपूत यांनी केले.
यावेळी तालुकाप्रमुख संजय मोटे, माजी जि.प अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे, माजी शिक्षण अधिकारी टी. पी. पाटील, रत्नाकर पंडित यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.