Mp Omraje Nimabalkar-Mla Kailas Patil Sarkarnama
मराठवाडा

Omraje Nimbalkar : `जात, गोत्र अन् धर्म आमचा शिवसेना`, कैलास पाटलांच्या धैर्याला सलाम..

माझ्या मित्राच्या या निष्टेबद्दल व धैर्याबद्दल मी त्यांना मनापासून सलाम करतो. असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त शिवसेनाच आहे. (Mp Omraje Nimbalkar)

सरकारनामा ब्युरो

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर आले आहे. यात शिवसेनेच्या (Shivsena) काही नेत्यांनी वेगळा निर्णय घेऊन आपल्याच काही सहकाऱ्यांना महाराष्ट्राबाहेर नेऊन पक्ष श्रेष्टींशी प्रतारणा केली आहे. यातील अनेकजण हे परत येऊ इच्छितात व या सगळ्या सहकाऱ्यांमध्ये पहिले हिमंतीचे काम केले ते माझे मित्र व सहकारी आमदार कैलास पाटील (Osmanabad) यांनी. त्यांनी स्वतः सगळा प्रसंग आज प्रेस समोर सांगितला.

सत्ता येत राहते व जात राहते परंतु जे धैर्य व निष्ठा तुम्ही शिवसेना व आपल्या पक्ष प्रमुखांबद्दल दाखवली त्याची नोंद ही कायमस्वरूपी राजकीय इतिहासात झाली, अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimabalkar) यांनी आमदार कैलास पाटील यांच्या धाडसाचे कौतुक केले. ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून या संदर्भातील आपला भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले, कैलासजी व माझा अनेक वर्षांचा स्नेह ,अतिशय संयमी व मितभाषी असलेले कैलास पाटील हे पक्षाबद्दल व "ठाकरे" परिवाराबद्दल कायमच भावूक असलेले मी वेळोवेळी पाहिले आहे. त्याची प्रचिती पूर्ण राज्याला या दोन दिवसात आलीच आहे. आम्ही बाळासाहेबांना दैवत मानणारे त्यांच्याच पुत्राला या संकटसमयी एकटे सोडून कसे जाणार.

आपण धाराशिवचे आमदार तर आहातच पण सर्वप्रथम बाळासाहेबांचे मावळेआहात, हेच कैलास पाटील यांनी दाखविले. माझ्या मित्राच्या या निष्टेबद्दल व धैर्याबद्दल मी त्यांना मनापासून सलाम करतो. असे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी पूर्ण राज्यात आहेत ज्यांचा धर्म, जात व गोत्र फक्त शिवसेनाच आहे. हे सर्वजण खंबीरपणे उद्धवजी ना साथ देणार आहेत, हे ही निश्चित, असा विश्वास देखील ओमराजे यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT