Monsoon Session of Maharashtra Assembly Sarkarnama
मराठवाडा

Monsoon Session News : मुंबईत पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती, विधान परिषदेचे कामकाज थांबवले..

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parisad : मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर पावसाच्या पाण्यात एक मुल आणि महिला वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. (Monsoon Session of Maharashtra Assembly) पावसामुळे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली असून लोकांना मदत करण्यासाठी आम्हाला मतदारसंघात जायचे आहे. त्यामुळे आजचे कामकाज थांबवा अशी मागणी आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह काही सदस्यांनी केली.

यावर उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी पावणेपाच वाजता सभागृहाचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला. त्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी सहमती दर्शवली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्तच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतांना (Mumbai) मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाने थैमान घातल्याची माहिती समोर आली.

अनेक भागांमधील घरांमध्ये पाणी शिरले, तर रस्त्यावरील पाण्यात एक लहान मुल आणि महिला वाहून गेल्याची माहिती प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सभागृहाला दिली. ज्या सदस्यांना प्रस्तावावर बोलायचे आहे, त्यांना उद्या पुन्हा संधी द्या, पण आजचे कामकाज थांबवा, अशी मागणी दरेकर यांनी उपसभापतींकडे केली. आपापल्या मतदारसंघात पोहचून नागरिकांना मदत करायची असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे यांच्यासह सर्व सदस्यांनी याला सहमती दर्शवली. त्यानंतर उपसभापतींनी आजचे कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या प्रस्तावावरील चर्चा आणि आजचे शिल्लक कामकाज पाहता उद्या, सभागृह सकाळी साडेदहा वाजता सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करत गोऱ्हे यांनी आजचे कामकाज थांबवत असल्याचे जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT