Chnadrakant Khaire - Shivsena UBT  Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News: खैरेंचे `लोकसभायान-६`, यशस्वीरीत्या लॅंडिंग करणार का ?

Chandrakant Khaire Prepare For Loksabha : शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला, ठाकरेंचे मुख्यमंत्री पद , महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि सगळे चित्रच पालटले.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Loksabha News: लोकसभेची मोहीम अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही मोहीम फत्ते करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमदेवार असणार? की शिंदे गटाचा यावर खल सुरू आहे. दावे-प्रतिदावे सुरू असतांना इकडे ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मात्र आपल्या `लोकसभायान-६`, मोहीमेला सुरूवात केली आहे.

दोनवेळा आमदार आणि सलग चार टर्म लोकसभेवर निवडून जाणारे ठाकरे गटातील ते ज्येष्ठ नेते आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाल्यामुळे (Chandrakant Khaire) खैरेंचा अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता. ही सल खैरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात देखील घर करून आहे. (Shivsena) जालना येथील एका सभेत उद्धव ठाकरे यांनी संभाजीगरमधील पराभव हा खैरेंचा नाही, तर माझा असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, खैरेंचे ठाकरेंकडून पुनर्वसन केले जाईल, अशी शक्यता होती पण ती फोल ठरली. राज्यसभेवर संधी असतांना तेव्हा आदित्य ठाकरे यांच्या आग्रहाखातर काॅंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली होती. (Aurangabad) त्यावरून खैरे यांनी उघडपणे नाराजी जाहीर केल्यामुळे मातोश्री आणि त्यांच्यात अनेक महिने दुरावा निर्माण झाला होता. नंतर खैरेंनी जुळवून घेत पुन्हा ठाकरेंशी जवळीक साधली. पण काचेला तडा गेला की गेलाच, असेच काहीसे खैरेंच्या बाबतीत घडले.

पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फुटला, ठाकरेंचे मुख्यमंत्री पद , महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि सगळे चित्रच पालटले. खैरेंना पुन्हा `अच्छे दिन`, आले. खैरेंचे पक्षांतर्गत विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबादास दानवे यांना राज्यपातळीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाले. त्यामुळे या दोघांमध्ये उघडपणे उडणारे खटके देखील काहीसे कमी झाले. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे हेच उमेदवार असतील असे निश्चित मानले जात आहे.

अंबादास दानवे नावाचा ग्रह त्यांच्या वाटेत येण्याची शक्यता असली तरी खैरेंचे पुनर्वसन त्यांच्या निष्ठा आणि ज्येष्ठतेचा विचार करता दानवे नावाचा ग्रह फार प्रभावी ठरणार नाही, असे दिसते. तिकडे भाजप-शिंदे गटातून कोण समोर येते यावर लढत अवलंबून आहे. शिवाय गेल्यावेळी लाॅटरी लागलेले खासदार इम्तियाज जलील हे मैदानात असणार आहेच. त्यामुळे या लोकसभा मोहीमेत खैरेंचे `यान`, सुरक्षित लॅंड करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT