Chandrashekar Bawnkule-Uddhav Thackeray News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Chandrashekar Bawnkule : उद्धव ठाकरे सोन्याचा चमचा घेवून अन् बदामाचा ज्युस पिवून मोठे झालेले नेते..

Bjp : सत्तेसाठी काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत तडजोड करणाऱ्या ठाकरेंनी भाजपसोबतची युती सांभाळली नाही

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : उद्धव ठाकरे यांच्या रक्तात जुळवून घेणे नाही, ते सोन्याचा चमचा घेवून आणि बदामाचा ज्यूस पिवून मोठे झालेले नेते आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांसोबतची त्यांची होवू घातलेली युती टिकणार नाही, असा दावा (Bjp)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

प्रकाश आंबेडककर (Prakash Ambedkar) हे ज्ञानी आहेत, त्यांना राज्यातील राजकीय परिस्थितीचा चांगला अभ्यास आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी युती करण्याचा त्यांनी फेरविचार करावा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे भाजप उमेदवार किरण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बावनकुळे औरंगाबादेत आले होते.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य करतांना त्यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्षाचे आमदार, खासदार सांभाळता आले नाही, ते आंबेडकरांसोबतची युती काय सांभाळणार?

सत्तेसाठी काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत तडजोड करणाऱ्या ठाकरेंनी भाजपसोबतची युती सांभाळली नाही, म्हणून तर त्यांचे ४०आमदार, १२ खासदार बाहेर पडले. युती टिकवणे, जुळवून घेणे हे उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाही. ते सोन्याचा चमचा घेवून आणि बदामाचा ज्युस पिवून मोठे झालेले नेते आहेत.

याउलट भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते आहे. नाना पटोले भाजपवर टीका करतात पण हे म्हणजे त्यांनी उंटावर बसून शेळ्या हाकण्यासारखे आहे. भारत जोडो दरम्यान दीड हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाऊ, तुम्ही काय बोलता, असा टोला देखील त्यांनी नाना पटोले यांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT