Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News
Imtiaz Jalil-Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : छत्रपती संभाजीनगर झाले, इम्तियाजजी आता राजकारण थांबवा..

सरकारनामा ब्युरो

Shivsena : संभाजी महाराजांचा औरंगाबादशी संबंध काय? असे विचारणाऱ्या इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी थोडी इतिहासाची पानं चाळावी. संभाजी महाराजांना इथेच सोनेरी महलात औरंगजेबाने कैद करून त्यांचे हालहाल केले होते. केवळ हिंदूनाच नाही, तर मुसलमानांचा छळणारा असा क्रूर राजा म्हणून औरंगजेब ओळखला जातो. तेव्हा संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध असा प्रश्न पुन्हा विचारू नका, असा टोला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांना लगावला.

शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले आहे, तेव्हा इम्तियाज जलील यांना माझी विनंती आहे, की त्यांनी राजकारण थांबवावे, असे आवाहन देखील खैरे (Chandrakant Khaire) यांनी केले. शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले आहे. (Shivsena) लोकभावना विचारात न घेता हुकूमशाही पद्धतीने ऐतिहासिक नाव बदलण्यात आल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

यावर प्रतिक्रिया देतांना चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज यांनी नामांतरावरून राजकारण करणे आता थांबवावे असा सल्ला दिल्ला. खैरे म्हणाले, केवळ राजकीय फायद्यासाठी इम्तियाज जलील यांचा नामांतराला विरोध सुरू आहे. युती सरकारने यापुर्वीच या शहराचे नाव संभाजीनगर केले होते. आता नव्याने राज्यातील सरकार आणि केंद्राने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. एकदा अधिकृत नामांतर झाल्यावर इम्तियाज यांनी त्यावरून राजकारण करण्याची गरज नाही. हा विषय आता संपला आहे.

छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध केला म्हणजे आपल्याला मुस्लीम मते मिळतील असे जर त्यांना वाटत असेल तर तसे होणार नाही. औरंगजेब त्यांच्या दृष्टीने महान वगैरे होता का? जर तसे असेल तर मुसलमानांच्या एका तरी व्यक्तीचे किंवा त्यांचे मुलाचे नाव औरंगजेब आहे का? हिंदूमध्ये तरी संभाजी, शिवाजी ही नावे असतात. कारण हे आदर्श राजे होते, तसा औरंगजेबाचा कोणताही आदर्श नाही. तुमच्या बी टीमचे जे मालक आहे, त्यांच्या सांगण्यावरून हे सगळं सुरू आहे का? असा चिमटा देखील खैरे यांनी इम्तियाज जलील यांना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT