Chandrakant Khaire-Nitin Gadkari News, Nagpur Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : भाजपला गडकरींची अडचण, म्हणून त्यांना बाजूला करण्याचे प्रयत्न..

Nagpur : चंद्रकांत खैरे हे आजपासून ३ मार्च पर्यंत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

सरकारनामा ब्युरो

Bjp : भाजपमधील केंद्रातील वजनदार मंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन गडकरींची (Nitin Gadkari) भाजपमध्ये घुसमट केली जात आहे. भाजपला त्यांची अडचण वाटू लागल्याने त्यांना मंत्रीपदावरून बाजूला करण्याचे देखील प्रयत्न झाले होते, असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. शिवगर्जना मोहिमेसाठी खैरे विदर्भात आले आहेत.

नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यांनी भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात कसे वातावरण तयार केले जात आहेत हे सांगितले. (Nagpur) शिवाय गडकरी जे माझ्याजवळ बोलले ते मी सार्वजनिकरित्या सांगू देखील शकत नाही, असेही खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमावल्यानंतर ठाकरे गटाने आपल्या नेत्यांना राज्यभरात दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार चंद्रकांत खैरे हे आजपासून ३ मार्च पर्यंत विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आज नागपूरमध्ये पोहचताच त्यांनी गडकरींबद्दलचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली.

खैरे म्हणाले, भाजपमध्ये नितीन गडकरी यांची मोठी घुसमट होत आहे. या संदर्भात गडकरी माझ्या जवळ जे बोलले ते सार्वजनिकरित्या बोलणार नाही. संघ परिवार गडकरींच्या पाठीशी असल्यामुळे प्रकाश जावडेकरांच्या वेळेला गडकरींना मंत्रिपदावरुन बाजूला केले गेलं नाही, असा दावा देखील खैरे यांनी केला.

मात्र, आता गडकरींच्या गोटातूनच अशी अफवा आहे की गडकरींना बाजूला केले जाणार आहे. पण भाजप श्रेष्ठींनी असे केले तर ते योग्य होणार नाही. गडकरीसारख्या माणसाला बाजूला करणे चूकीचे ठरेल असेही ते म्हणाले. नितीन गडकरी मागे उद्धव ठाकरे यांना भेटले होते, ते नेहमी भेटत असतात.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आमच्यासोबत दगा केला असा आरोप करतांनाच सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. जेव्हा गद्दार १६ आमदारांचे निलंबन होईल, तेव्हा या सरकारचे काय होते ते बघा, असा इशारा देखील खैरे यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT