Chandrakant Khaire News Sarkarnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : कराडांना कितीही तयारी करू द्या, शिवसेनेसमोर ते टिकणार नाहीत..

Jagdish Pansare

Marathwada Shivsena : छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गेल्यावेळी काही लोकांच्या गद्दारीमुळे इथे माझा पराभव झाला होता. आजही लोक त्याबद्दल पश्चाताप करतात. (Chandrakant Khaire News) येथील हिंदुत्ववादी मतदार कायम शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. आम्ही माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांना पराभूत केले आहे. त्यामुळे भागवत कराडांना कितीही तयारी करू द्या, शिवसेनेसमोर त्यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

संघटनात्मक जबाबदारीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना लोकसभा मतदारसंघाची धुरा खैरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना खैरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॅा. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांचे कुठलेही आव्हान मान्य करायला नकार दिला. कराड आम्हाला अजूनही नगरसेवकच वाटतात, असा टोलाही खैरै यांनी यावेळी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी खैरे (Chandrakant Khaire) यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी दिल्यानंतर ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. (BJP) भाजपनेही या मतदारसंघावर दावा सांगत डॅा. भागवत कराडांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. गेली पंचवीस-तीस वर्ष या मतदारसंघात एकत्र लढलेले हे दोन पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत बंड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल राज्यात सहानुभूतीचे वातावरण आहे. शिवाय चंद्रकांत खैरे यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या पाच हजार मतांनी पराभव झाला होता, त्यामुळे पक्ष त्यांना आणखी एक संधी देण्याच्या तयारीत आहे. संघटनात्मक जबाबदारी आल्यानंतर खैरे पहिल्यादां माध्यमांशी बोलले.

कराड यांच्या उमेदवारीबद्दल त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी शिवसेने माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्याचा या मतदारसंघात पराभव केला आहे. कराड तर आम्हाला नगरसेवकच वाटतात. त्यामुळे त्यांचा शिवसेनेसमोर टीकाव लागणार नाही, असे म्हणत खिल्ली उडवली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकणारच, असा दावाही केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT