औरंगाबाद : शिंदे सरकारने राज्यातील पालकमंत्री जाहीर केले, औरंगाबादला २२ वर्षानंतर संदीपान भुमरे यांच्या रुपाने स्थानिक पालकमंत्री मिळाले. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यानंतर दुसरे स्थानिक पालकमंत्री म्हणून आता पुन्हा खैरे यांनी त्यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात केलेल्या विकासकामांची चर्चा होऊ लागली आहे. नवनिर्वाचित (Aurangabad) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी मात्र खैरेंनी शहर भकास केले, कुठलाच विकास केला नाही, अशी टीका केली.
त्याला खैरै यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. खैरे म्हणाले, मी पाच वर्ष पालकमंत्री होतो, तेव्हा जिल्ह्यात अनेक विकासाची कामे केली, लोकांनी मला २० वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं ते उगाच नाही. (Marathwada) तुमच्या घरासमोरून गेलेला राष्ट्रीय महामार्ग देखील माझ्याच पाठपुराव्यामुळे झालेला आहे हे विसरू नका.
तुम्ही पालकमंत्री झाला असलात तरी तुम्हाला काही कळणार नाही, अधिकारी खूप हुशार असता ते तुमचं ऐकणार नाही. तुम्हाला कुत्रं देखील विचारणार नाही, अशा शब्दात खैरे यांनी पालकमंत्री भुमरे यांच्यावर टीका केली. पालकमंत्री झाल्यानंतर संदीपान भुमरे यांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले खैरे यांच्यानंतर स्थानिक पालकमंत्री मिळाल्यामुळे सहाजिकच खैरेंच्या काळातील कामांची चर्चा सुरू झाली.
यावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला तेव्हा, खैरे यांनी जिल्हा भकास केला, त्यांना वीस वर्षात काहीच विकास करता आला नाही, असा आरोप भुमरे यांनी केला होता. त्याला खैरेंनी उत्तर देतांना पालकमंत्र्यांना कुत्रं देखील विचारणार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला. भुमरे हे खेड्यातून आलेले आहेत, त्यांना काही समजतं का?
पालकमंत्री झाला आहात, किती दिवस राहाल हे माहित नाही, त्यामुळे मिळालेल्या संधीचा चांगला उपयोग करून शहर व जिल्ह्याच्या विकासाची कामे करा. माझ्यावर टीका करण्याआधी मला लोकांनी चारवेळा खासदार म्हणून निवडून दिले होते याची आठवण ठेवा. मी काही लंलूपंजू खासदार नव्हतो, आजही लोक माझ्याकडे कामे घेऊन येतात, असा दावा देखील खैरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.