Chandrakant Khaire-Dr.Bhagwat Karad Controversy News Sararnama
मराठवाडा

Chandrakant Khaire News : माझे वर्चस्व नाही म्हणणारे, भागवत कराडच 'मला शिवसेनेत घ्या म्हणून आले होते' चंद्रकांत खैरेंचा दावा!

Shivsena-BJP Controversy : कराड यांना नगरसेवक, दोनवेळा महापौर मीच केले. गोपीनाथ मुंडे यांनी सांगितल्यानंतर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कराड यांच्या नावावर संमती मिळवली होती.

Jagdish Pansare

  1. भागवत कराड यांनी “चंद्रकांत खैरेंचं वर्चस्व संपलं” असे विधान केल्यानंतर खैरेंनी त्यांच्यावर पलटवार करत मोठा दावा केला आहे.

  2. खैरेंचे म्हणणे आहे की, “तेच (भागवत कराड) माझ्याकडे शिवसेनेत सामील होण्यासाठी आले होते.”

  3. या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात नव्या वादळाला सुरुवात झाली असून भाजप-शिवसेनेतील तणाव वाढला आहे.

Shivsena-BJP Clash : दिवाळीच्या तोंडावर महायुतीतील नेते आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदाव्यांचे फटाके फुटू लागले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या राजकारणात पंचवीस वर्ष युतीत वावरलेले शिवसेना-भाजपाचे नेते आता एकमेकांचे विरोधक बनले आहेत. शिवसेना फुटीनंतर त्यांच्यातील अंतर कमालीचे वाढले आहे. यातूनच माजी मंत्री खासदार डाॅ. भागवत कराड, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असतात.

चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे वर्चस्व आता संपले आहे, महापालिका निवडणुकीनंतर ते कुठे दिसणार देखील नाहीत, अशी टीका भागवत कराड यांनी नुकतीच केली. या टीकेला चंद्रकांत खैरे यांनी उत्तर देताना मोठा दावा केला आहे. शिवसेना-भाजप युती असताना कराड हे स्वतःच माझ्याकडे मला शिवसेनेत घ्या म्हणून आले होते. परंतु गोपीनाथ मुंडेसाहेबांचा मला फोन आला, आमचा माणूस तिकडे कशाला घेता? आणि मग तो प्रवेश राहिला.

भागवत कराड (Bhagwat Karad) यांना नगरसेवक, दोनवेळा महापौर मीच केले हे ते विसरले का? गोपीनाथ मुंडे यांनी सांगितल्यानंतर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कराड यांच्या नावावर संमती मिळवली होती. एकदा नाही तर दोनदा त्यांना महापौर पद माझ्यामुळे मिळाले होते. आजही मी रस्त्यावर उतरतो तेव्हा लोक माझ्याभोवती गराडा घालतात. मी शिवसेनेचा एकनिष्ठ माणूस आहे, कराड हे एकटे फिरतात, असा टोलाही खैरे यांनी लगावला.

निष्क्रिय म्हणून मंत्रीपद गेले..

भागवत कराड यांना पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती, पण ते पराभूत झाले. पुढे पंकजा मुंडे आणि पक्षाच्या वादातून समाजाचा एक माणूस हवा म्हणून कराड यांना भाजपने राज्यसभेवर खासदार केले. त्यानंतर मंत्रीही केले, पण ते निष्क्रीय ठरले आणि त्यामुळेच त्यांचे मंत्रीपद गेले. आता ते सगळीकडे एकटेच फिरतात. मी हे काम केलं, गॅसची पाईप लाईन आणली असं सांगतात पण प्रत्यक्षात काहीच नाही. अशा निष्क्रिय माणसाबद्दल मी अधिक बोलणार नाही, असेही खैरे म्हणाले.

ठाकरे ब्रँडच खरा..

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांच्यासोबत मी काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून मला लोक ओळखतात. महाराष्ट्रात ठाकरे ब्रँन्डच खरा ब्रँन्ड आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने सत्ताधारी पक्ष बिथरले आहेत. केवळ मुंबईच नाही, तर राज्यभरातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांचा करिश्मा दिसेल, असा दावाही खैरे यांनी केला.

FAQs (Marathi)

प्र.१: वादाची सुरुवात कशामुळे झाली?
उ. भागवत कराड यांनी खैरेंचे वर्चस्व संपल्याचे विधान केल्यानंतर हा वाद पेटला.

प्र.२: खैरेंनी काय उत्तर दिले?
उ. खैरेंनी पलटवार करत सांगितले की, कराड हेच शिवसेनेत सामील होण्याची इच्छा व्यक्त करत माझ्याकडे आले होते.

प्र.३: हा वाद कोणत्या पार्श्वभूमीवर सुरू आहे?
उ. संभाजीनगरमधील आगामी निवडणुकांपूर्वी भाजप आणि शिवसेनेत प्रभाव वाढवण्याच्या स्पर्धेत हा संघर्ष दिसत आहे.

प्र.४: भाजपने या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे?
उ. भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

प्र.५: या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
उ. भाजप-शिवसेनेच्या गटांतील स्पर्धा वाढेल आणि स्थानिक संघटनांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT