Chandrashekhar Bawankule Anuradha Chavan .jpg Sarkarnama
मराठवाडा

Anuradha Chavan News : महापालिकेच्या व्यापारी संकुलाच्या प्रस्तावाला बावनकुळेंचा 'ग्रीन सिग्नल'; आमदार चव्हाणांच्या प्रयत्नांना यश

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा येथे महापालिकेला व्यापारी संकुल उभारण्यासाठीच्या जागेचा प्रस्ताव तत्काळ पाठवा, त्याला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

Jagdish Pansare

Assembly Winter Session : छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा येथे महापालिकेला व्यापारी संकुल उभारण्यासाठीच्या जागेचा प्रस्ताव तत्काळ पाठवा, त्याला दोन दिवसात मंजुरी दिली जाईल, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिले. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पुढाकारानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत हा तोडगा काढण्यात आला.

महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते रुंद करण्यासाठी जून, जुलै महिन्यात रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली. या मोहिमेला चिकलठाण्यातील मालमत्ताधारकांनी स्वतः होऊन रस्ताबाधित मालमत्ता पाडून प्रतिसाद दिला. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेत याच भागात असलेल्या शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल उभारून रस्ता रुंदीकरणामुळे बेरोजगार झालेल्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार गट नंबर 737 मधील 1.57 हेक्टर जमीन मिळावी म्हणून, जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविण्यात आला. दरम्यान, महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. मात्र नियमांवर बोट ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन देण्यास टाळाटाळ करत विषय जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे टोलविला होता. जागेची किंमत सुमारे 33 कोटी रुपये असल्याने एवढ्या मोठ्या किमतीची जमीन देण्याचे अधिकार आपल्याला नाहीत, असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे म्हणणे होते.

याविषयात आमदार अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार शनिवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑनलाइन पद्धतीने बैठक घेतली. नागपूर येथून घेण्यात आलेल्या बैठकीत अनुराधा चव्हाण यांची प्रत्यक्ष तर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे, उद्यान अधिक्षक विजय पाटील आदी सहभागी झाले होते.

यावेळी बावनकुळे यांनी सार्वजनिक उपक्रमासाठी महापालिकेने जमिनीची मागणी केलेली आहे. एवढे दिवस हा प्रस्ताव प्रलंबित का राहिला? अशी विचारणा केली व तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT