Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group
Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group Sarkarnama
मराठवाडा

Beed NCP Sabha News : अजितदादा गटाने 'उत्तर'सभा नसल्याची दवंडी पिटवली; पण मुंडे, भुजबळांसह मुश्रीफांच्या निशाण्यावर राहिले ते पवारच..!

Dattatrya Deshmukh

Beed: राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटींनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात स्वाभिमानी सभांचा धडाका लावला आहे. छगन भुजबळांचा येवल्यानंतर,बीडमध्ये सभा घेत पवारांसह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला होता. पवार गटाच्या टीकेनंतर तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आली. मात्र, ही सभा उत्तरसभा नसल्याचे सांगितले गेले. पण राष्ट्रवादीच्या बहुतेक नेत्यांनी रविवारच्या सभेत शरद पवारांवर निशाणा साधला.

राज्याचे कृषिमंत्री मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्यासह पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी नेत्यांनी नाव न घेता टीका आणि पवारांना अनेक प्रश्न विचारले.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्ष फुटलाच नाही, बहुतांशी आमदार आमच्यासोबतच आहेत. धनंजय मुंडे म्हणाले, इतिहास विचारल्याची खंत आयुष्यभर राहील. पण, आपण विधान परिषदेत विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामाचा उहापोह तुमच्याच ‘लोक माझे सांगाती’मध्ये कसा लिहिला. एक शेर म्हणून २०१४ साली बिनशर्त पाठिंब्याचा निर्णय कसा झाला, आपण तर पहाटे उठत नाही मग पहाटेचा शपथविधी कसा झाला.

पहाटेच्या शपथविधीवर छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनीही ‘गुगली म्हणता’ पण गुगलीवर स्वत:चाच खेळाडू बाद करायचा असतो का. माझ्या, धनंजय मुंडेंच्या व मुश्रीफांच्या मतदारसंघात सभा घेता आणि बारामतीचा प्रश्न आला की,सुप्रिया सुळे,अजित पवार यांना नेता म्हणतात. तुम्हीच जयंत पाटील, प्रफुल्ल पटेलांना दिल्लाला जायला वाटाघाटी करायला सांगता, आपल्याला किती जागा मिळाव्यात, पदे कोणती मिळावीत व कामे कोणती करायची यादीच यादी सांगता, असा आरोपही छगन भुजबळांनी केला.

आपल्यावर आरोप होताच राजीनामा घेतला पण तुमच्यावरही १९९३ साली आरोपानंतर तुम्ही राजीनामा का दिला नाही, असा सवाल त्यांनी नाव न घेता केला. डबल मिनिंग जॉब तुम्हाला शोभत नाही, असे म्हणत कोणावर वैयक्तिक जाऊ नका हे तुम्हीच सांगायचा,पण आता तुम्हीच ते करत असल्याचा आरोपही छगन भुजबळ यांनी केला. यावेळी त्यांनी ‘उडवाच माझी मान माझा नकार नाही’ ही कविताही सादर केली. हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूरच्या सभेवरुन अप्रत्यक्ष पवारांवर टिकास्त्र सोडले.

शरद पवारांनी (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा घेतल्यावर आता आज अजित पवारांची देखील बीड जिल्ह्यात सभा होत आहे. दरम्यान, यावेळी सभेत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अनेक मंत्री देखील उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मोठ वक्तव्य करत जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे.

जितेंद्र आव्हाड हा भेकड माणूस आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडला होता आणि निवडणूक न लढण्याबाबत बोलला होता. एक गुन्हा दाखल झाला त्यामुळे असं वागला होता असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT