Chhatrapati Sambhaji News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhaji News: पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा संभाजीनगरात मशाल..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhaji Nagar Political News: इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ते राजकारणात अनेकदा दिसून आले. मुंबई, ठाणे, नाशिकनंतर शिवसेनेला यश मिळाले ते मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये. पदार्पणातच 1988 च्या महापालिका निवडणुकीत 27 नगरसेवक निवडून देत येथील जनतेने बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादाला पसंती दर्शवली.

महापालिकेत मिळालेल्या घवघवीत यशानंतर शिवसेनेने 1989 च्या लोकसभा निवडणुकीत थेट उमेदवार रिंगणात उतरवला. मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने पुरस्कृत करत अपक्ष उमेदवारी दाखल करायला सांगितले. त्यावेळी निवडणूक आयोगाने सावे यांना मशाल चिन्ह दिले होते.

सावे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेतली होती. या सभेचे गारुड असे काही चालले की अपक्ष मोरेश्वर जावे संभाजीनगरमधून निवडून आले. आता पंचवीस वर्षांनंतर जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण बदलले आहे.

धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर महाराष्ट्रात सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळवल्यानंतर शिवसेना विभागली गेली आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला निवडणूक आयोगाने बहाल केले, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह घेऊन लोकसभेची निवडणूक लढवावी लागत आहे.

25 वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. आता 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल पुन्हा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पेटवतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोरेश्वर सावे यांच्या विजयाची पुनरावृत्ती संभाजीनगरात होणार का? यावर इतिहासाची पुनरावृत्ती ठरणार आहे. धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याची सवय जडलेल्या संभाजीनगर व राज्यातील मतदारांना मशाल हे चिन्ह तसे नवे नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीत पक्षचिन्ह महत्त्वाचे नसते तर उमेदवार आणि व्यक्ती महत्त्वाची असते, असे सांगत आपण स्वतः अनेक निवडणूक चिन्हांवर विजयी झाल्याचे उदाहरण दिले आहे. या पार्श्वभूमीवर 25 वर्षांपूर्वी मशाल चिन्हावर लढलेल्या शिवसेनेला हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अवघड नसल्याचे बोलले जाते.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT