Court bailiff and lawyers at the District Collector office in Chhatrapati Sambhaji Nagar during execution proceedings related to delayed land compensation payment. Sarkarnama
मराठवाडा

Court News: जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीचे आदेश! लेखी हमी दिल्यानं टळली नामुष्की

District Collector chair seizure : वाकोद प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश दिले; मात्र आठ आठवड्यांत रक्कम देण्याच्या लेखी हमीने कारवाई तात्पुरती थांबली.

Jagdish Pansare

Chhatrapati SambhajiNagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वाकोद प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा वाढीव मोबदला 2 कोटी 22 लाख 61 हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, त्यानंतरही रक्कम न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयातर्फे बेलीफसह वकिलांनी खुर्ची जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले, आठ आठवड्यांत रक्कम जमा करण्याचे लेखी अश्वासन लघुपाटबंधारे विभागाने दिल्यामुळे तूर्तास जप्ती टळली.

लेहा जहांगीर (ता. फुलंब्री) येथील शेतकरी बजरंग ताटू (मृत), रूपचंद ताटू (मृत) यांच्यासह काही वारसांनी मूळ दावा दाखल केला होता. संबंधितांची शेतजमीन वाकोद मध्यम प्रकल्प (ता. फुलंब्री) साठी भूसंपादित केली होती. मात्र, पुरेसा मोबदला न मिळाल्याने त्यांनी वाढीव मोबदल्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यात यश न आल्याने शेतकरी कुटुंबीयांनी वाढीव मोबदल्यासाठी दावा दाखल केला होता. त्यावर दिवाणी न्यायालयाने 2 कोटी 22 लाख 61 हजार रुपये देण्याचे आदेश वर्ष 2022 मध्ये दिले होते.

मूळ प्रकरण 2006 मधील असून, 2022 मध्ये न्यायालयाने रक्कम देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही रक्कम मिळाली नाही, म्हणून तक्रारदार शेतकऱ्यांनी अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला. आदेशानंतरही भरपाई न मिळाल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्या खुर्ची जप्तीचे वॉरंट काढले.

त्यानुसार या वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी मंगळवारी (ता. 20) न्यायालयाचे बेलिफ यांच्यासह ॲड. वीरेंद्र बाराहाते, ॲड. राजेंद्र धरफळे पाटील, साईराज बाराहाते जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले. त्यावेळी लघुपाटबंधारे क्र. 1 च्या कार्यकारी अभियंत्यांनी आठ आठवड्यांच्या आत संपूर्ण नुकसान भरपाई अदा करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्ची जप्तीची कारवाई तात्पुरती थांबविण्यात आली. याचिकाकर्त्यांतर्फे वीरेंद्र बारहाते काम पाहत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT