Ambadas Danve Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve: Video भाजप अन् प्रशासनाला दानवेंनी दिला सज्जड दम; तुम्ही एकत्र आलात तरी आम्ही पुरून उरु!

chhatrapati sambhajinagar Aditya thackeray tour thackeray group and bjp activists clashed:'जो समोर येईल त्याचा चुराडा होईल, ही आमची धमकी आहे. आम्ही हात बांधून राहणार नाही. तोंडाला पट्टी बांधली आंदोलन झाले आता आरे ला कारेनेच उत्तर देणार'

Mangesh Mahale

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भाजप कार्यकर्त्यांना गोंधळ घालून विरोध केला आहे. भाजप-ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत एकमेकांवर धावून गेल्याने राडा झाला. या राड्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांवर संतापले.

आदित्य ठाकरे यांचा यांचा हा संघटनात्मक दौरा आहे. कुणाच्या हॉटेल व घराबाहेर आंदोलन करायला नको होते. आंदोलनासाठी काही स्थळ ठरलेली आहे.पोलिसांची काठी आम्हाला बळ देते. हा अन्याय अत्याचार झालेला आहे. पोलिस आयुक्तांना सांगून देखील पोलिस दखल घेत नसेल तर पोलिस पक्षपाती करीत आहे, असा आरोप दानवे यांनी केला.

"पोलिस अन् भाजप एकत्र आले तरी त्यांना आम्ही पुरून उरु," असा सज्जड दम दानवे यांनी सत्ताधारी आणि प्रशासनाला दिला. 'जो समोर येईल त्याचा चुराडा होईल, ही आमची धमकी आहे. आम्ही हात बांधून राहणार नाही. तोंडाला पट्टी बांधली ते आंदोलन झाले आता आरे ला कारे करूनच उत्तर देणार,'असा इशारा त्यांनी दिला

कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी फक्त आमच्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, असा आरोप अंबादास दानवेंनी केला.

काल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आंदोलन केले, ते मोदी यांच्या विरोधातील आंदोलन नव्हते. आम्ही मोदींचा निषेध केलेला नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आमचे आंदोलन होते, असे दानवे यांनी स्पष्ट केले. भाजपा आंदोलकांनी आक्रमक होत आम्ही दिशा सालियन प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली.

काल (रविवारी) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते, त्यांचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. आज भाजपकडून आदित्य ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले.

आदित्य ठाकरे यांना काळे झेंडे दाखवून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. दिशा सालीयनचे पोस्टर भाजप कार्यकर्त्यांच्या हातात होते.रामा हॉटेलच्या बाहेर ठाकरे यांच्याविरोधात ते घोषणा देत होते. तेव्हा ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे आले. दोन्ही गट आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT