Marathwada Political News : राज्यभरात आज उत्साहाच्या वातावरणात गणरायाचे आगमन झाले. वाद, मतभेद, विसरून रोज एकमेकांची उणीदुणी काढणारे जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते या निमित्ताने एकत्र आले. (Sambhajinagar Ganesh Festival) छत्रपती संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीच्या आरतीसाठी शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, भाजप असे सगळेच हात जोडून उभे होते. हे चित्र पाहिल्यावर सर्वसामान्यांनी गणराया यांना सुबुद्धी दे, अशी प्रार्थना केली नसेल तर नवलच.
गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींनंतर राजकारणाचा खेळखंडोबा झाल्याची सर्वसामान्यांची भावना झाली आहे. (Shivsena) फोडाफोडी, पक्षांचे तुकडे, आरोप-प्रत्यारोप याचा आता उबग आला आहे. किमान विघ्नहर्त्यांच्या आगमानावेळी तरी हे नको, अशी सर्वांची इच्छा आणि अपेक्षा असते. (BJP) सुदैवाने हे चित्र आज जिल्ह्याच्या राजकारणात दिसले. अर्थात याला निमित्त ठरले ते गणरायाचे आगमन.
दरवर्षीप्रमाणे शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री संस्थान गणपतीची आरती राजकीय नेत्यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे, (Chandrakant Khaire) अंबादास दानवे तर शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे, भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट एकाचवेळी उपस्थितीत होते.
अतुल सावे, चंद्रकांत खैरे यांनी गणपतीची आरती केली. त्यात बाकीच्या नेत्यांनी टाळ्या वाजवत सहभाग घेतला. अनेक वर्ष एकाच पक्षात सोबत काम केलेली ही मंडळी सध्या एकमेकांच्या विरोधात उभी आहेत. गणपती बाप्पाने मात्र आज त्यांना एकमेकांच्या सोबत उभे केले. पाहणाऱ्यांना हे दृश्य हायसे वाटले. गणराया यांना सुबुद्धी दे, असे साकडे नक्कीच शहरवासीयांनीच या वेळी घातले असणार.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.