Uddhav Thackeray, Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024: संभाजीनगरमधल्या राड्यानंतर मनसे संतापली; ठाकरे गटाला भरला दम; 'आमच्या नादाला लागू नका, नाहीतर…'

सरकारनामा ब्यूरो

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency: देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) धामधून सुरु आहे. तर चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटच दिवस आहे. त्यामुळे आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते धावपळ करताना दिसत आहेत.

मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. मनसेसह (MNS) महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेली बाचाबाची आता चर्चेचा विषय बनली आहे.

क्रांती चौकातून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची रॅली निघणार होती. याच दरम्यान, महायुतीचे कार्यकर्ते त्याठिकाणी पोहोचल्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्ते आमने-सामने येताच गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तर यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे देखील आक्रमकपणे मनसेच्या कार्यकर्त्यांना आव्हान देताना दिसत होते. याच सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे आक्रमक झाली असून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संदीप देशपांडे म्हणाले, "आमच्या मनसैनिकांच्या नादाला कोणी लागू नये, अन्यथा पार्श्वभागाला पाय लावून पळायला लावू, शिवाय यांनी हात तोडण्याची भाषा करू नये, कारण यांना आम्ही पळून पळून मारलं आहे. चंद्रकांत खैरे हे आऊटडेटेड नेते आहेत. सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल आहे, हे काय आम्हाला धमकी देणार?"

देशपांडे पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपचा प्रचार केला तेव्हा ते देशप्रेमी आणि आम्ही प्रचार केला की देशद्रोही. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल घाणेरडी वक्तव्यं केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसला आहात. राऊत जेव्हा वर जातील, तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत, काँग्रेससारख्या देशद्रोह्यांसोबत तुम्ही गेल्यामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत आहे. बाळासाहेबांना जो त्रास होत आहे तो आमचा नाही यांचा होत आहे, असं म्हणत देशपांडे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT