Sanjay Raut, Narendra Modi sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election: मोदी हा चेहरा नाही, तर भुताटकी; संजय राऊतांचं वादग्रस्त विधान, नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut On Narendra Modi: "भाजपने अबकी बार चार सौ पारचा नारा दिला आहे, पण हे तुम्ही कोण ठरवणारे? आज सांगतो भाजप दोनशेच्यावर जात नाही आणि देशात इंडिया आघाडी तीनशे पार पोहाेचली आहे."

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar: भाजप म्हणतं की, 'अबकी बार 400 पार' का तर म्हणे आमच्याकडे मोदींचा चेहरा आहे, महाविकास आघाडीकडे काय आहे? मोदी हा चेहरा नाही, तर ती भुताटकी आहे. ते पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत (Sanjay Ruat) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. या वेळी राऊत म्हणाले, "शोले चित्रपटातील डायलॉग आठवतो का, 'सो जा बच्चे नही तो, गब्बर आ जायेगा', तसं या मोदींचं झालं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकांना त्यांचा चेहरा पाहून भीती वाटू लागली आहे की, कधी ते टीव्हीवर येतील आणि काय घोषणा करतील? या दहशतीखाली लोक आहेत. त्यामुळे मोदींचा चेहरा आता डरावना झाला आहे, ते कोणत्याही परिस्थितीत पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत. या देशात लोकशाही आहे, येथील जनता ते ठरवणार, मोदी नाही" असंही राऊत म्हणाले.

भाजपने (BJP) अबकी बार चार सौ पारचा नारा दिला आहे, लोकशाही तुमच्या बापाची आहे का? हे तुम्ही कोण ठरवणारे? आज सांगतो भाजप दोनशेच्यावर जात नाही आणि देशात इंडिया आघाडी तीनशे पार पोहाेचली आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरला नाही, कारण इथे चंद्रकांत खैरेंची (Chandrakant Khaire) हवा आहे. म्हणून त्यांचा उमेदवार ठरत नाहीये, असा टोलाही राऊतांनी लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विशेष प्रेम असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवसेनेचा खासदार नाही, हे मनाला पटत नाही. पाच वर्षांपूर्वी खैरेंचीच हवा होती, पण आपल्याला दगाफटका झाला. खैरे संभाजीनगरातच राहिले, पण ते मनाने पाच वर्षे दिल्लीतच होते. आता खैरे तुम्हाला चिंता नाही, तुमच्यासोबत अंबादास दानवे (Ambadas Danve) आहेत, त्यांनी तुमच्या विजयाची जबाबदारी घेतली आहे, असा विश्वासही राऊतांनी या वेळी खैरेंना दिला.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT