Chhatrapati Sambhajinagar Market Committee News Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Market Committee : काळेंचा अर्ज वैध ठरला, माजी सभापती पठाडेंना आणखी एक धक्का..

Bjp : जगन्नाथ काळे यांच्या नावाने बाजार समितीने दुकानाचा एकही परवाना दिला नाही. भाऊसाहेब काळे यांच्यानावावर परवाने आहेत.

सरकारनामा ब्युरो

Marathwada : छत्रपती संभाजीनगर बाजार समिती (Market Committee) निवडणुकीत माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांच्या उमेदवारी अर्जांवर भाजपचे माजी सभापती राधाकिशन पठाडे यांनी आक्षेप घेतला होता. ते व्यापारी असून त्यांच्या नावावर गाळे असल्याचे आक्षेपात नमूद करण्यात आले होते. त्यानूसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळे यांचा अर्ज अवैध ठरवला होता.

पुढे हा वाद पणन संचालकांपुढे गेला, या संदर्भात जगन्नाथ काळे यांना दिलासा देणारा निकाल आला असून त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. (Bjp) माजी सभापती राधाकिशन पठाडे यांच्या कार्यकाळात झालेल्या ८८ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणाची कालच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दखल घेतली. त्यानंतर आता पठाडे यांचा आक्षेप फेटाळत माजी प्रशासक जगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज देखील वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे पठाडे यांना हा दुसरा धक्का असल्याचे बोलले जाते.

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत (Congress) काँग्रेसचे नेते तथा माजी प्रशासक जनगन्नाथ काळे यांचा उमेदवारी अर्ज पणन संचालक मोहन निंबाळकर यांनी सोमवारी (ता.१७) वैध ठरविला. (Mahavikas Aghadi) काळे यांचा अर्ज जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी अपात्र ठरवला होता. या निर्णयामुळे काळे यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.

बाजार समितीच्या निवडणूकीत जगन्नाथ काळे यांनी सहकारी संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काळे त्यांचे बंधू भाऊसाहेब काळे हे बाजार समितीचे अनुज्ञप्तीधारक असून बाजार समिती परिसरात ३५,३६ व ३७ क्रामांकाचे गाळे मेहेर सिडसच्या नावावर असून त्याचे मालक हे जगन्नाथ काळे आहेत. ते जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्षही असल्याने त्यांचा शेतकऱ्यासाठी असलेल्या सहकारी संस्था मतदारसंघातील अर्ज अवैध ठरवावा असा अक्षेप माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी नोंदविला होता.

त्यावर सुनावणी घेत निवडणूकी अधिकारी तथा जिल्हा उपनिबंध मुकेश बारहाते यांनी सहा एप्रिल रोजी जगन्नाथ काळे यांचा अर्ज अपात्र ठरवला होता. त्या विरोधात जगन्नाथ काळे यांनी पणन संचालकाकडे पठाडे यांच्या विरोधात दोन अपील सादर केली होती. त्यावर १३ एप्रिल रोजी सूनावणी झाली. त्यात पठाडे यांच्या बाजूने वकिलांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता.

त्यानुसार पणन संचालकांनी १७ एप्रिल रोजी सुनावणी करण्याचा निर्णय घेत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेत काळे यांचा अर्ज वैध ठरवत जिल्हा उपनिबंधकांचा आदेश रद्दबातल ठरवला. जगन्नाथ काळे यांनी या निर्णयास अॅड. प्रसाद जरारे यांच्या मार्फत पणन संचालक मोहन निंबाळकर यांच्याकडे आव्हान दिले होते. यावर सोमवारी झालेल्या सुनावणीत जगन्नाथ काळे यांच्या नावाने बाजार समितीने दुकानाचा एकही परवाना दिला नाही. भाऊसाहेब काळे यांच्यानावावर परवाने आहेत. मात्र, जगन्नाथ काळे आणि भाऊसाहेब काळे हे एकत्र कुटुंबातील असल्याचा कोणताही पुरावा बाजार समितीने दिला नाही.

जगन्नाथ आणि भाऊसाहेब हे विभक्त कुटुंबात राहत असल्याचा पुरावा अपिलकर्त्यानी सादर केला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आदेश फेटाळून जगन्नाथ काळे यांचा अर्ज कायम ठेवण्यात येत असल्याचे पणन संचालकांनी निर्णयात म्हटले आहे. दरम्यान, पणन संचालकांनी दिलेल्या निर्णयाची तांत्रिक बाजू तपासण्यात येईल.अजून वेळ आहे, त्यामुळे या निर्णया विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. न्यायलयातून आम्हाला न्याय मिळेल, असे राधाकिसन पठाडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT