Chhatrapati Sambhajinagar News Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation News : काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकाने टाकला डाव, वंचितसोबत सेटिंग; ‘एमआयएम’ला झटका...

Congress VBA alliance : भाजपचे-8 , एमआयएमचे-4, शिंदेगट-2 शिवसेना-1 आणि लोकसेवा विकास आघाडी-1 याप्रमाणे सदस्य नियुक्त केले जाणार आहेत.

माधव इतबारे

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील स्थायी समित्यासाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. यासाठी विरोधकांनीही डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. महापालिकेत एकमेव काँग्रेस नगरसेवकाने वंचित आघाडीच्या नगरसेवकांसोबत जात पाच जणांची लोकसेवा विकास आघाडी केल्याने याचा थेट फटका एमआयएमला बसणार आहे. या आघाडीमुळे त्यांचा एक सदस्य कमी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

महापालिकेतील राजकीय पक्षाच्या तौलनिक संख्याबळानुसार स्थायी समितीच्या 16 सदस्य निवडताना भाजपाला 8, एमआयएमला 4, शिवसेना 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व लोकसेवा विकास आघाडीच्या एका सदस्याची निवड होणार आहे. महापालिकेची पाच मार्चला सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात स्थायी समितीसह विविध समित्यांचे सदस्य निवडले जाणार आहेत.

हे सदस्य त्या-त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येवरून निवडले जाणार आहेत. 115 पैकी भाजपाचे 57 नगरसेवक असून त्यापाठोपाठ एमआयएम 33, शिवसेना 13, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, वंचित बहुजन आघाडी 4, कॉग्रेस 1, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 या प्रमाणे नगरसेवकांची संख्या आहे. त्यातून स्थायी समितीसाठी 16 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी ५ मार्चला विशेष सभा बोलावण्यात आली आहे.

त्यासाठी गटनेत्यांना नगरसेवकांची नावे द्यावी लागणार आहेत. त्यानुसार भाजपचे-8 , एमआयएमचे-4, शिंदेगट-2 शिवसेना-1 आणि लोकसेवा विकास आघाडी-1 याप्रमाणे सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. यापूर्वी एमआयएम पक्षाचे पाच सदस्य स्थायी समितीवर जातील, असे सांगितले जात होते, पण वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस एकत्र आल्याने एमआयएम पक्षाला फटका बसला आहे.

विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

यावेळी महिला व बालकल्याण, शहर सुधार, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण या पाच समित्यांसाठी प्रत्येकी 9 सदस्य निवडले जाणार आहेत. या समित्यांमध्ये देखील भाजप-4, एमआयएम-3, शिवसेना-1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-1 या प्रमाणे 9 सदस्य निवडले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT