MNS News, Chhatrapati Sambhajinagar
MNS News, Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar News : नामांतराच्या समर्थनात मनसेची स्वाक्षरी मोहिम..

सरकारनामा ब्युरो

MNS : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्यास केंद्र सरकारने नुकतीच मंजुरी दिली. (MNS) या संदर्भात राज्य शासनाकडून अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली असून आता अधिकृतरित्या या बदलेल्या नावांचा वापर शासकीय कामकाजात केला जात आहे. एकीकडे सरकारने सगळी प्रक्रिया पुर्ण केली असतांना या नामातरावरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे.

एमआयएमने या नामांतराला विरोध दर्शवत साखळी उपोषण सुरू केले आहे. तर दुसरीकडे मनसेने नामांतराच्या समर्थनात स्वाक्षरी मोहिम सुरू केली आहे. (Aimim) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली आज साखळी उपोषणाला सुरूवात झाली. तर या ठिकाणापासून काही अंतरावर म्हणजे टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी मनसेने नामांतराला पाठिंबा दर्शवत स्वाक्षरी मोहिम सुरू केली.

त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात गाजत असलेला नामांतराचा मुद्दा यापुढेही तापवत ठेवण्याचे प्रयत्न होणार असे दिसते. खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या आवाहनानूसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नामांतराच्या विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आले. नामांतरविरोधी कृतीसमितीच्या वतीने हे आंदोनल बेमुदत सुरू राहणार आहे.

लोकांच्या भावना लक्षात ने घेता हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय लादण्यात आल्याचा आरोप इम्तियाज यांनी यावेळी केला. तर मनसेने इम्तियाज यांच्या या भूमिकेचा विरोध करत त्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका कशासाठी? असा सवाल करत एमआयएमला जशास तसे उत्तर देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

त्याप्रमाणे आज एकीकडे नामांतराच्या विरोधासाठी एमआयएमचे आंदोलन, तर दुसरीकडे मनसेची स्वाक्षरी मोहिम असे चित्र होते. मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेने ही स्वाक्षरी मोहिम राबवली. त्याला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT