Maharashtra DJ ban latest update: आवाज वाढव डीजे तुला..या सुप्रसिद्ध गाण्याची आठवण सध्या पदोपदी होताना दिसते आहे. पुण्यातील गणेशोत्सवात डीजे नको यासाठी विद्यानंद बापट यांनी सुरू केलेल्या मोहिमेनंतर डीजे बंदी विरोधातील वातावरण राज्यभरात तापू लागले आहे.
सरकारच्या वतीने गणेशोत्सवामध्ये डीजे नको, अशी भूमिका जाहीर करण्यात आल्यानंतर महायुती सरकारमधील मंत्र्यांनीही यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी डीजे बंदीची कठोर अंमलबजावणीसाठी संजय शिरसाट यांचा आवाज चांगलाच वाढलेला दिसला. डीजे बरोबर शहरात कठोर हेल्मेट सक्ती राबवावी कोणाचीही गैर करू नये अशा सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. गणेशोत्सवाच्या काळात ड्रग्स, बटन,गांजा आणि दारू पिणाऱ्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
पोलिसांना ड्रग्स, बटन विक्रेत्यांची माहिती आहे. पोलिसांनी सतर्क राहून थेट विक्रेत्यांची धिंड काढावी, कोणाचीही गैर करू नका, दया माया दाखवू नका, असेही शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांना सांगत कारवाईसाठी फ्री हॅन्ड दिल्याचे दिसून आले.
सर्वसामान्य जनता आणि महिलांनी डीजे बंदीची मागणी केली आहे. त्यानुसार डीजे वाजणार नाही, डीजे बंदी लागू राहील. डीजेचा सर्वाधिक त्रास वयोवृद्ध आणि लहान मुलांना होतो, त्यामुळे डीजे वाजवणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
गणेशोत्सवा सारख्या महत्त्वाच्या सणावेळी तो निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी आयोजित पालकमंत्री संजय शिरसाट आणि पोलीस आयुक्तालयाच्या बैठकीकडे सत्ताधारी भाजपने मात्र पाठ फिरवल्याचे दिसून आले. तर गणेश महासंघाची पदाधिकारी ही या बैठकीला हजर नव्हते. यावरून त्यांचा बैठकीवर बहिष्कार आहे का? अशी चर्चा सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.