Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhjinagar : मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीपूर्वीच मोठा राडा; पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा नेमकं काय घडलं?

Sambhajinagar election counting violence : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मोठा गोंधळ झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नेमकं काय घडलं वाचा.

Rashmi Mane

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच शहरात मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. शहरातील 115 जागांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात होणार होती. मात्र मतमोजणी सुरू होण्याआधीच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर तणावाचं वातावरण निर्माण झाला.

मतमोजणी केंद्राच्या प्रवेशद्वारावर उमेदवारांच्या प्रतिनिधींना आत प्रवेश देण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच परिस्थिती चिघळली. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत उमेदवारांच्या प्रतिनिधींवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईत शिवसेनेचे कार्यकर्ते विकास जैन यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांच्या पाठीवर मारहाणीचे व्रण दिसून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर मतमोजणी केंद्राच्या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. माहिती मिळताच शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला. मतमोजणीच्या दिवशीच अशा प्रकारची घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं.

दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या देखील मतमोजणी केंद्रावर दाखल झाल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाईवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मतमोजणी सुरू होऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला. कारवाई होईपर्यंत कोणत्याही प्रतिनिधीला मतमोजणी कक्षात प्रवेश देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT