Ambadas Danve-Nitesh Rane

 

Sarkarnama

मराठवाडा

कोंबडी चोर, बेडुक आता मांजर झाले आहेत ; दानवेंचा राणेंवर प्रहार

काल-परवा सभागृहाबाहेर आदित्य ठाकरे येत असतांना खालच्या सभागृहातील एका सदस्याने मांजरा अवाज काढत म्यॅव म्यॅव केले, हा अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारा प्रकार होता. (Ambadas Danve)

जगदीश पानसरे

मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकार व त्यांचे मंत्री चांगले काम करत असतांना केवळ त्यांना आणि महाराष्ट्राला (Maharashtra) बदनाम करण्यासाठी विरोधक त्यांच्यावर टीका करत आहेत. काल-परवा सभागृहाबाहेर एका सदस्याने राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) विधानभवनात येतांना मांजराचा आवाज काढत म्याॅव म्याॅव केले. हे आधी कोंबडीचोर होते, नंतर बेडूक उड्या मारू लागले आणि आता त्यांची मांजर झाली आहे, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर प्रहार केला.

विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताववर बोलतांना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला देखील चढवला. आदित्य ठाकरे हे वाघ आहेत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अशा माकड चाळ्यांना कधीच भीक घालणार नाही, असेही दानवे म्हणाले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नते प्रवीण दरेकर यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरील अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देतांना अंबादास दानवे यांनी मागच्या सरकारच्या काळातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेला बदल हे आकडेवारीसह सभागृहात मांडले. अंबादास दानवे म्हणाले, राज्याला बदनाम करण्यासाठी विरोधक काम करत आहेत. पण महाविकास आघाडीच्या कोरोना काळातील चांगल्या कामाची दखल थेट जागतिक पातळीवर घेतली गेल्याने विरोधक तोंडावर आपटले आहेत.

पण ईडी, सीबीआय सारख्या संस्थांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील नेते, मंत्र्यांना त्रास देण्याचे प्रकार विरोधकांकडून सुरूच आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक देखील देश व जागतिक पातळीवर झाले. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणासाठी केलेल्या कामाची देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले, परंतु काहीजणांना यामुळेच पोटसुळ उठला आहे.

काल-परवा सभागृहाबाहेर आदित्य ठाकरे येत असतांना खालच्या सभागृहातील एका सदस्याने मांजरा आवज काढत म्यॅव म्यॅव केले, हा अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारा प्रकार होता. हे कोंबडीचोर आधी बेडूक उड्या मारत डरावडराव करत होते, आता त्यांची मांजर झाल्यामुळे ते म्यॅव म्यॅव करत असल्याचा टोला देखील दानवे यांनी नितेश राणे यांचे नाव न घेता लगवाला. पण महाविकास आघाडी सरकार अशा लोकांना कधीही भीक घालणार नाही, असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT