Ajit Pawar Rally In Marathwada Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : `मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना` पाच वर्ष सुरु राहणार, पण..

Chief Minister Ladki Bahin Yojana will continue for five years, but Ajit Pawar's Googly : ही योजना फसवी असून फक्त येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचे बोलले गेले, परंतु ही योजना कायमस्वरूपी असून भविष्यात बंद होणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. परंतु त्यासाठी आम्हाला मतदान करा.

Jagdish Pansare

NCP (AP) Marathwada Political News : महिलांना आर्थिक सक्षम करणे व त्यांचा सन्मान वाढवणे हा आमच्या सरकारचा हेतू आहे. यामुळेच `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना` आणली आहे. केलेल्या कामाचा आढावा जनतेसमोर मांडावा म्हणून ही जन सन्मान यात्रा काढली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सध्याचे राज्य सरकार हे सर्वसामान्य सरकार असून आम्ही काढत असलेल्या जनसन्मान यात्रेस `मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` या योजनेमुळे महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

`मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण` ही योजना फसवी असून फक्त येणारी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणल्याचे बोलले गेले, परंतु ही योजना कायमस्वरूपी असून भविष्यात बंद होणार नाही, अशी ग्वाही अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. परंतु त्यासाठी आम्हाला मतदान करा, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

आमदार बाबासाहेब पाटील यांचे कौतुक करतांना त्यांनी मतदार संघाच्या विकासासाठी सुमारे 2 हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी आणला, असे सांगत यामुळे मतदार संघाचा मोठा विकास झाल्याचा दावा अजित पवार यांनी केला. केंद्राच्या विचाराचे राज्यात सरकार असेल तर राज्याला अधिकचा निधी मिळतो व राज्याचा विकास होतो.

महिलावर अत्याचार करणे हा अक्षम्य गुन्हा असून अशा घटनेतील आरोपी बाबत सरकार गंभीर असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. (NCP) दरम्यान, हा कार्यक्रम सुरू असताना अजित पवार यांच्या भाषणावेळी सकल मराठा समाज बांधवांनी कार्यक्रम सुरू असलेल्या हॉलच्या गेट समोर मराठा आरक्षणाची मागणी करत घोषणा दिल्या.

पण यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखून धरल्यामुळे कार्यक्रमात अडथळा आला नाही. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT