Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar : माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली : सत्तारांचे मोठे विधान

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : माझ्याविरोधात कट रचणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली आहे. तसेच, आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsat) हे सिल्लोडच्या कृषी महोत्सवाला का आले नाहीत, हे मला माहिती नाही, असे विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. त्यामुळे सत्तार यांचा रोख कुणाकडे आहे, याची चर्चा रंगली आहे. (Chief Minister took information about the leader plotting against me : Sattar)

नागपूर अधिवेशनात कृषीमंत्री सत्तार यांच्यावर गायरान जमीन गैरव्यवहार आणि सिल्लोड कृषी महोत्सवासाठी वसुलीचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यावर बोलताना शिंदे गटातील नेत्यानेच माझ्याविरोध कट रचल्याचा आरोप सत्तार यांनी केला होता. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही करण्यात आली होती. आज मुख्यमंत्री सिल्लोडला कृषी महोत्सवाच्या उदघाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी संबंधित नेत्याची माहिती घेतली आहे, असे सत्तार यांनी या वेळी सांगितले.

सत्तार म्हणाले की, मी कोणाचेही नाव घेतले नाही. पण मला ज्या वेदना होत होत्या. माझ्या मनाला जे वाटत होते. आपल्याकडून एखादी भावना तिकडे जावी, हीच त्यामागची पार्श्वभूमी आहे. आमदार संजय शिरसाठ माझे मित्र आहेत. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही. जे कृषी महोत्सवाला आले त्यांना धन्यवाद आणि जे आले नाहीत, त्यांनाही धन्यवाद.

मी कुणावरही नाराज नाही. तसेच, मुख्यमंत्रीही माझ्यावर नाराज नाहीत, असा दावा करून अब्दुल सत्तार म्हणाले की, शिंदे गटातील काही नेते सोडले तर माझ्यावर कोणीही नाराज नाही, असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT