Uddhav Thackeray Latest Marathi News sarkarnama
मराठवाडा

नामांतराच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंचे भाष्य; तर संभाजी महाराज मला टकमक टोक दाखवतील

औरंगाबदच्या नामांतरावरुन उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचा भाजपवर निशाणा

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : संभाजीनगर कधी करणार असे विचारले जात आहे. आम्ही विधानसभेत ठराव केला आहे. मंत्रिमंडळात ठराव झालेला आहे. विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले आहे. ते बदलत नाही. संभाजीनगर नामकरण करणारचे.. पण त्या आधी नावाला साजेल असे शहर करणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगितले. (Uddhav Thackeray Latest Marathi News)

मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना (ShivSena) संभाजीनगर शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त जाहिर सभेत उद्धव ठाकरे बोलत आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) चौफेर टिका केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आधी विमानतळाचे नाव बदला आम्ही तुमचा सत्कार करू. सत्ता गेल्यावर यांच्या अंगात येते. संभाजीनगर कधी करणार हे कोण सांगणार, हे माझ्या वडिलांचे वचन आहे. एक दीड वर्षाअगोदच ठराव झाला आहे. तो ठराव केंद्राकडे पाठवला आहे. तुम्ही तुमचे झाकून ठेवायचे. मी नामांतर करेल तेव्हा आदर्श करेल. पाणी देईल, रस्ते देईल. नाहीतर संभाजी महाराज म्हणतील चल जरा रायगडावर तुला टकमक टोक दाखवतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचे हिदुत्व मोजणारे तुम्ही कोण. तुम्हाला मोजपट्टी दिली का. एकदा होऊन जाऊद्या, शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केले आणि भाजपने काय केले ते बाबरी मशिद पाडली तेव्हा यांची पळापळ झाली होती. आमच्या अंगावर आला तर आम्ही त्यांच्या अंगावर गेल्या शिवाय राहणार नाही, अशा इशाराही त्यांनी भाजपला दिला. भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असे नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू, असा इशाराही ठाकरे यानी दिला. आमच्याकडे भगवा आहे. तो भगवा काहीतरी संस्कार हा वारकऱ्यांचा आणि शिवरायांचा भगवा आहे. हिंम्मत असेल तर काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करून दाखवा.

कोणाला हिंदुत्व शिकवता आहात? त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती तर आज हिंदुत्वाच्या जोरावर सत्ता स्थापन झाली असती का? काश्मीरी पंडितांनी पुन्हा एकदा घर सोडले आहे. घरामध्ये, कार्यालयामध्ये गोळ्या घातल्या जात आहेत. बाळासाहेबांनी काय सांगितले होते, मला देऊळात घंडा बडवणारे हिंदु नको आहेत, अतिरिक्यांना बडवणारे हिंदु पाहिजे. न्यायालयाचा आदेश आला, आणि जनतेकडे झोळ्या पसरवून मंदीर उभे रात आहे. तुमचे कर्तृत्व काय आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT