औरंगाबाद : भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आज शिक्षक दिनीच शिक्षकांच्या गुणवत्तापुर्वक शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थीत केले आहे. मुख्यालयी राहणाऱ्या (Teacher) शिक्षकांचा सत्कार आणि पुजन करण्याच्या निमित्ताने आमदार बंब (Prashant Bamb) यांनी आपल्याच मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची `शाळा` घेतली. राज्याचे मुख्य्मंत्री, राष्ट्रपती कोण आहेत? गावच्या सरपंचाचे नाव, तालुक्याचा आमदार कोण? या पासून तर लसावी, मसावी, पाढे असे अनेक प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले.
नववीच्या मुलांना या साध्या प्रश्नांची उत्तरे न आल्यामुळे बंब यांनी पुन्हा एकदा शिक्षकांच्या गुणवत्तापूरक शिक्षणावर शंका उपस्थीत केली आहे. (Aurangabad) नववीच्या मुलांना जर राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव, मतदारसंघाचे आमदार माहित नसले, पाढे येत नसतील तर मग शिक्षकांनी पिढी बरबाद केली असे मी म्हटलो तर चुकले कुठे? असे म्हणत बंब यांनी पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला आहे.
पावसाळी अधिवेशनात मुख्यालयी न राहता घरभाडे घेवून शासनाची फसवणूक केली जात असल्याचा मुद्दा प्रशांत बंब यांनी उपस्थीत केला होता. तेव्हापासून आमदार बंब विरुद्ध शिक्षक, संघटना असा वाद पेटला आहे. कुठल्याही परिस्थितीत बंब माघार घ्यायला तयार नाहीत, उलट आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत त्यांनी आपले मुद्दे आणि केलेले आरोप कसे खरे आणि वस्तुनिष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आपल्याच मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या २९ पैकी मुख्यालयी राहणाऱ्या एका शिक्षिकेचा बंब यांनी सत्कार व पूजन केले. त्यानंतर अन्य शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्यामुळे किती गुणवत्ता ढासाळली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. नववीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे बहुतांश विद्यार्थ्यांना देता आली नाही. त्यामुळे बंब यांनी पुन्हा एकदा शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा आपला मुद्दा कसा योग्य आहे? हे सांगितले.
आज शिक्षक दिन असल्यामुळे मुख्यालयी गैरहजर अलेल्या शिक्षकांबद्दल आपण काही बोलणार नाही, त्यांचे पुढे काय करायचे ते बघू असे म्हणत, इशारा देखील दिला. एकंदरित आमदार बंब यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षक व तरीही त्यांची बाजू घेणाऱ्या संघटना व लोकप्रतिनिधींविरोधातील भूमिका अधिक कठोर केल्याचे दिसून आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.