Raosaheb Danve  Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : बाजार समितीत चुरशीने मतदान; दानवेंसमोर २५ वर्षाची सत्ता राखण्याचे आव्हान

Raosaheb Danve : भोकरदन बाजार समिती संचालक पदासाठी मतदान घेण्यात आले

सरकारनामा ब्यूरो

दीपक सोळंके

भोकरदन : जालना जिल्ह्यातील भोकरदन बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता.२५) मतदान घेण्यात आले. या निवडणुकीसाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे तसेच पत्नी निर्मलाबाई दानवे, त्यांचे चिरंजीव तसेच भाजपाचे जालना जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील हसनाबाद मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

भोकरदन बाजार समिती संचालक मंडळ पदाच्या १६ जागेसाठी रविवारी (ता.२५) निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण ३२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून ही बाजार समिती मागील २५ ते ३० वर्षांपासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या ताब्यात आहे. याच बाजार समितीसाठी मोठ्या चुरशीने मतदान झाले आहे. त्यामुळे रावसाहेब दानवेंसमोर २५ वर्षाची सत्ता राखण्याचे आव्हान असणार आहे.

भाजपाचे वर्चस्व असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Congress) माजी आमदार चंद्रकांत दानवे व त्यांचे बंधू ॲड.सुधाकर दानवे यांनी काँगेस, शिवसेना ठाकरे गट या मित्र पक्षाला सोबत घेत पॅनल उभे केले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असून (सोमवारी ता.२६) निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

दरम्यान, रविवारी हसनाबाद येथील मतदान केंद्रावर जावून खासदार रावसाहेब दानवे तसेच पत्नी निर्मलाबाई दानवे, आमदार संतोष दानवे यांनी सहकारी संस्था मतदार संघातून मतदानाचा हक्क बजावला. तर आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे उद्या (सोमवारी ता.२६) समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT