Mp OmRaje Nimabalkar Warn Officers News
Mp OmRaje Nimabalkar Warn Officers News Sarkarnama
मराठवाडा

Mp OmRaje Nimabalkar Warn Officers : कचरा, अनियमित पाणीपुरवठ्याच्या तक्रारीने ओमराजे भडकले, अधिकाऱ्यांना झापले ...

सरकारनामा ब्युरो

Dharashiv : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर शहरातील अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठा विषयावरून चांगलेच आक्रमक झाले. (Mp OmRaje Nimabalkar Warn Officers) नगरपरिषदेतील आढावा बैठकीत त्यांनी पावसाळ्यापुर्वी शहरातील स्वच्छता आणि सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ओमराजे यांचे रौद्ररुप पाहता अधिकाऱ्यांच्या पाचावर धारण बसली होती.

शहरातील अनियमित पाणीपुरवठा आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. (Omraje Nimabalkar) नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. याची गंभीर दखल घेत आज धाराशिव शहरातील पाणी पुरवठा व कचरा व्यवस्थापन बाबत आमदार कैलास पाटील (Kailas Ghadge Patil) व मकरंद राजेनिंबाळकर यांच्या समवेत नगरपालिका कार्यालयात ओमराजे यांनी बैठक घेतली.

यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारला. तसेच पावसाळ्यापुर्वी शहरातील कचरा आणि पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे, अन्यथा कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. (Osmanabad) शहराला उजनी धरणातून पाणी पुरवठा सध्या १५ दिवसाच्या फरकाने होत असून याबाबत उजनी येथील ३ पंप कायम ठेवावे. तसेच खांडवी पंप हाऊसला एक्स्प्रेस फिडर मधून २४ तास वीजपुरवठा चालू ठेवावा अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

चालू पाईपलाईन फुटल्यास तातडीने लिकेज काढावेत, शहराला होणारा रुईभर व तेरणा धरणातील पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो का याची खातरजमा करावी, शहरातील बंद बोअर चालू करून घ्यावेत. तसेच आठवड्यात किमान ५ दिवसाला नागरिकांना पाणी पुरवठा करावा, येणाऱ्या सोमवारपासून सदरील पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच शहरात कचरा मोठया प्रमाणात साठला असून दुर्गंधी पसरत आहे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही ओमराजे यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्या उपसून घ्याव्यात, असेही त्यांनी बजावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT