यवतमाळ : काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र अल्पसंख्याक कमिटीच्या अध्यक्षपदी आमदार वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नेत्यांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. एकाच व्यक्तीकडे सहा पदे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला असल्याची भावना काही नेत्यांमध्ये आहे.
उदयपूर येथे काँग्रेसचे नुकतेच संकल्प चिंतन शिबिर झाले. या शिबिरात एकमताने 'एक व्यक्ती, एक पद,' 'एक कुटुंब,एक तिकीट'असा संकल्प करण्यात आला. पण वजाहत मिर्झा (Wajahat Mirza) यांच्या या नियुक्तीमुळे या संकल्पाला पक्षश्रेष्ठींनी केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आहे.
वजाहत मिर्झा हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहेत. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा), अध्यक्ष-अभ्यासगत मंडळ शासकीय वैधकीय महाविद्यालय यवतमाळ, सदस्य- अल्पसंख्यांक हे सर्व पद असतांना आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे 'एक व्यक्ती- एक पद'या धोरणाचा पक्षश्रेष्ठींना विसर पडला का, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
आधीच काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहेत.अशात काँग्रेसला जनतेशी तुटलेला संपर्क वाढविण्यासाठी नविन कार्यक्रम हाती घेणे गरजेचे असतांना होतकरू कार्यकर्त्यांना संधी न देता एकाच व्यक्तीची सहा पदांवर नियुक्ती करण्यात आल्याने खरचं काँग्रेसला अच्छे दिन येतील का? प्रदेशाध्यक्षाच्या ही गंभीर बाब लक्षात आली नसेल का ? असे अनेक प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थितीत केले जात आहेत.
चिंतन शिबिरात संकल्प केल्याच्या काही तास उलटत नाही, तर पुन्हा काँग्रेस हायकंमाडने एकाच व्यक्तीला सहावे पद बहाल केल्याने चिंतन शिबिराचं काय झालं? असा सवाल पक्षातील नेते मंडळी विचारत आहेत. वजाहत मिर्झा विरोधात बोलायला काँग्रेसमधील नेते मंडळी समोर यायला तयार नाही, त्यामुळे त्यांची अवस्था नाक दाबून तोंडावर बुक्याचा मार खाण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा काँग्रेसमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.