Congress News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : अजितदादांच्या आमदाराला काँग्रेसच्या नेत्याने दिली मोठी ऑफर

Sachin Waghmare

Latur News : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारानिमित्त महायुती सरकारमधील नेते राज्यव्यापी दौरे करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी देखील वेगवेगळ्या यात्रा सुरू केल्या आहेत. त्यातच आता काँग्रेसचे माजी मंत्री अमित देशमुख यांनी अजित पवार गटाच्या आमदारालाच लोकसभेत तुम्ही आम्हाला मदत केली, आता आमच्याकडून लढा असे म्हणत काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

अहमदपूर मतदारसंघातील अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (Congress) उमेदवाराला मदत केली होती. त्यांनी केलेली मदत कामाला आली होती. त्यामुळे त्यांचे जाहीर आभार मानता येत नाहीत, मात्र, जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांचे आभार मानतो, असे म्हणत माजी मंत्री अमित देशमुख यांनी बाबासाहेब पाटील यांची वाट बिकट केली. एवढेच नव्हे तर काँग्रेसमध्ये येऊन निवडणूक लढविण्याची ऑफरच त्यांना दिली आहे. (Amit Deshmukh News)

अहमदपूरच्या जागेसाठी काँग्रेसने लढले पाहिजे, काँग्रेसने लढले पाहिजे असा आग्रह अनेकजण करीत असतात, त्यामुळे बाबासाहेब पाटील तुम्हीच जर इकडे आलात तर काँग्रेसही लढेल आणि मागणीही पूर्ण होईल, असेही अमित देशमुख म्हणाले.

नुकताच लोकसभेत बदल घडवला. राज्यात होणाऱ्या बदलाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे हे पाहिले प्रतिक आहेत, आणि बाबासाहेब पाटील, कळत न कळत लोकसभेच्या निवडणुकीत तुमची जी मदत आम्हाला झाली. त्याच्याबद्दलही किमान घरामध्ये आल्यावर तरी आभार मानले पाहिजेत, एव्हढ तरी आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांनी घालून दिलेल्या संस्कृतीचे पालन करतो, असे अमित देशमुख म्हणाले.

अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील लोकसभा निवडणुकीत प्रचाराला बाहेर पडले नव्हते, असा आरोप त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहे. याच कारणामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील आणि प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी बाबासाहेब पाटील यांचे विरोधात मोर्चेबांधणी केली होती. जाहीर वक्तव्य करत बाबासाहेब पाटील यांना एकही भाजपाचे मत पडू देणार नसल्याचा निर्धार केला होता. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना मध्यस्थी करावी लागली होती.

त्यानंतर काही काळ या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं होतं. त्यानंतर आता माजी मंत्री अमित देशमुख यांनी वक्तव्य करून अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील येऊ घातलेल्या निवडणुकीत अडचणीत निर्माण केल्या आहेत. त्यामुळे आता बाबासाहेब पाटील यामधून कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT