Latur Congress sarkarnama
मराठवाडा

Latur Congress : काँग्रेसची प्रचारात आघाडी; भाजपमध्ये समन्वय, मात्र उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा!

Latur Lok Sabha Constituency : लातूर लोकसभा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे

सुधाकर दहिफळे

Loksabha Election 2024 : लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने प्रचाराची फेरी पूर्ण केली असताना, भाजपच्या गोटात काहीतरी सुस्ती असल्याचे दिसत आहे. दरम्यान, उमेदवार बदलाच्या चर्चांमुळे अन्य उत्सुक कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाच्या आदेशाची वाट पाहत आहेत.

लातूर लोकसभा मतदारसंघ मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. कॉंग्रेसने(Congress ) डॉ. शिवाजी काळगे यांना, तर भाजपने खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित आघाडीने नरसिंग उदगिरकर याना उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसची प्रचाराची एक फेरी पूर्ण झाल्याचे जाहीर केले आहे. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख , आमदार धीरज देशमुख मतदारांत फिरत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपचे शृंगारे यांच्यासह युती सरकारमधील राष्ट्रवादीचे(NCP) मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार गोविंद केंद्रे आदी नेते समन्वय ठेवून आहेत. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला नाही. त्यातच भाजप उमेदवार बदलणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. अर्थात यातच विरोधी पक्षाचे समर्थक आघाडीवर दिसत आहेत.

पालकमंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) यांनी अचानक दौरा केल्याने या चर्चेला बळ आले. या परिस्थितीत भाजपकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेले विश्वजित गायकवाड , ॲड. दिग्विजय काथवटे , रेणापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश सोनवणे, अनिल कांबळे हे पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.

कॉंग्रेसचा प्रचार जोरात... -

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात कॉंग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. पण लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ वगळता इतरत्र फारसा प्रचाराचा जोर नाही. भाजपचे भक्ती-शक्ती मंगल कार्यालय वगळता इतरत्र अद्याप नियोजन लागलेले नाही.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT