Congress Leader Parbhani
Congress Leader Parbhani Sarkarnama
मराठवाडा

Congress : एक कुटुंब एक पद, परभणीच्या पदाधिकाऱ्याचा प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा

गणेश पांडे

परभणी : काॅंग्रेस पक्षाच्या नव्या धोरणानूसार एक कुटुंब एक पद अंगीकारात परभणी येथील कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी त्यांच्या कॉग्रेस प्रदेश कमिटीच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला.(Parbhani) जिल्ह्यातील कॉग्रेसचे उद्योनमुख नेतृत्व म्हणून सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्याकडे पाहिले जाते.

सातत्याने विविध उपक्रमाच्या माध्यमातून कॉग्रेसची (Congress) ध्येय धोरणे ते जनसामान्यांपर्यत पोहचवण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे पक्षानेही त्यांच्यावर वारंवार वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या. (Marathwada) कॉग्रेसचे देशातील नेते मल्लिकार्जून खर्गे, कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण या नेत्यांचे खंदे समर्थक म्हणून हत्तीअंबीरे ओळखले जातात.

त्यांच्याकडे प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी होती. त्याच बरोबर पक्षाने त्यांच्यावर नुकतीच कॉग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देखील दिली होती. परंतू, गुरुवारी (ता.दोन) शिर्डी येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात दोन पदे असलेल्या पदाधिकाऱ्यांना एक पद सोडावे असे आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिले.

त्यामुळे सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी त्यांच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सूपुर्द केला. आपण पक्षाच्या ध्येय, धोरणानुसार व पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचे पालन करून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT