औरंगाबाद : शिक्षकांना मुक्त वातावरणात शिकवू द्या, मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करा, अशी मागणी करत शिक्षक (Kapil Patil) आमदार कपिल पाटील यांनी सरकारवर तोफ डागली. (Teacher) रविवारी (ता.११) दुपारी भरपावसात (Aurangabad)औरंगाबादेत हजारो जि.प. शिक्षकांसह शिक्षक आमदार, पदवीधर आमदार एकवटले होते.
नवीन शैक्षणिक धोरण गरिबांच्या मुलांच्या मुळावर उठले आहे. गरिबांची मुलं जिल्हा परिषदांच्या शाळात शिकतात. (Marathwada) शिक्षकांना बदनाम करून या शाळा बंद करण्याचे कटकारस्थान सरकार करत आहे. आमदार बंब हे प्यादे आहेत, त्यांचा बोलवता धनी दुसराच आहे. महाराष्ट्रात नथुरामी वृत्ती यशस्वी होणार नाही, याची काळजी घ्यावी.
ही बोलणारी प्यादी तुमची नाहीत, हे जाहीर करा, आमच्यानादी लागू नका. सन्मान राखा, कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम बंद करा, अशी मागणी देखील शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली.भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी ग्रामविका खात्याशी संबंधित प्रश्नावर बोलतांना पावसाळी अधिवेशनात शिक्षकांच्या मुख्यालयी न राहण्याचा मुद्दा उपस्थितीत केला होता.
त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. बंब यांच्यावर शिक्षक व त्यांच्या संघटनांनी सुविधा नसल्यामुळे शिक्षक मुख्यालयी राहत नाही, असे सांगत सुविधा पुरवण्याची मागणी केली. त्यानंतर बंब विरुद्ध शिक्षक, संघटना व शिक्षक, पदवीधर आमदार असा संघर्ष सुरू झाला.
या वादातूनच आज औरंगाबादेतील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत बंब यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक आमदार कपिल पाटील, विक्रम काळे, सतीश तांबे, व मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी केले.भर पावसात निघालेल्या या मोर्चाला शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.