Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar: नामांतराचा वाद पेटला; राष्ट्रवादीचे ५० पदाधिकारी सामूहिक राजीनामा देणार?

सरकारनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar : केंद्र सरकारने गेल्या महिन्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर अशा नामांतराला अधिकृतपणे मान्यता दिली. पण केंद्र सरकारच्या या निर्णयावरुन आत औरंगाबादचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

नामांतराला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरु केलं. असे असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या नामांतराच्या वादात उडी घेतली आहे. छत्रपती संभाजीनंगरमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नामांतराला विरोध करत सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराला सहमती दिली आणि तेव्हापासून शहराचे नामांतर करण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात आले, असा आमचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे, अशी आमची भावना होती. यासाठीच आम्ही आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होतो. परंतु नामांतराला समर्थन दिल्यामुळे आता आमची ही भावना संपली आहे. पक्ष आमच्यावर न्याय करू शकत नाही, असं या पदाधिकाऱ्यांनी म्हणणं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी नामांतराला परवानगी दिल्याने छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 10 आणि छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातील 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे आता नामंतराला समर्थन केल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मुद्दा चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT