fir Filed Against Bjp Deputy Mayor
fir Filed Against Bjp Deputy Mayor Sarkarnama
मराठवाडा

भाजप उपनगराध्यक्षाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा

सरकारनामा ब्युरो

वसमत : वसमत पालिकेचे भाजपाचे विद्यमान उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्या विरुध्द वसमत शहर पोलिस ठाण्यात तब्बल २२ महिन्यानंतर बुधवारी ( ता. ८) रात्री उशीरा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. वसमत येथील एका महिलेने वसमत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यामध्ये उपनगराध्यक्ष सिताराम गणपत म्यानेवार यांनी ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ ते साडेनऊच्या दरम्यान, घरातील दुकानात येऊन विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारास शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही नमुद केले. यावरून वसमत शहर पोलिसांनी सिताराम म्यानेवार याच्या विरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करीत आहेत. भाजपने मात्र विनयंभागाचे आरोप फेटाळत हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा राजकिय षडयंत्राचा भाग असल्याचा दावा केला आहे.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करून आमचे उपनगराध्यक्ष म्यानेवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले.भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार आहेत.

यावेळी उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, नगरसेवक शिवाजी अडलिंगे, विष्णु बोचकरी, गणेश काळे, भगवान कुदाळे, भारत स्वामी ,ऍड. रंगनाथ देशमुखे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT