Marathwada : केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांचे केपटाऊनसह विविध शहरातील पर्यटनाचे आणि जंगल सफारीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. दानवे सपत्नीक दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर आहेत.
दक्षिण अफ्रीकेतील केप टाऊनमध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान `माइनिंग इंडाबा व्यावसायिक संमेलन` आयोजित करण्यात आले असून यात सहभागी होण्यासाठी दानवे तीन दिवस आधीच दाखल झाले आहेत. (Railway Minister) तत्पुर्वी दानवे यांनी सपत्नीक दक्षिण अफ्रिकेतील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या, जंगल सफारीचा आनंदही लुटला. (Jalna) या आनंदाचे क्षण त्यांनी सोशल मिडियावर देखील व्हायरल केले आहेत.
देशात असतांना कुर्ता-पायजामा आणि जॅकेटमध्ये दिसणारे दानवे दक्षिण अफ्रिकेत मात्र जंटलमन लूकमध्ये दिसले. आता आजपासून रावसाहेब पाटील दानवे याचा अधिकृत दक्षिण अफ्रीकेचा दौरा सुरू झाला आहे. ६ ते ९ फेब्रुवारी असा हा चार दिवसांचा दौरा असणार आहे. केप टाऊनमध्ये होणाऱ्या `माइनिंग इंडाबा व्यावसायिक संमेलनात` ते सहभागी होणार असुन आपले विचार मांडणार आहेत.
जगभरातील अनेक देशातील माईन्स मंत्रालयाचे मंत्री, अधिकारी तसेच खाणींचे व्यवसायिक या संमेलनात सहभागी होतील. आज झालेल्या उदघाटन सोहळ्यात ते सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारने खाण मंत्रालया अंतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
`आत्मनिर्भर भारत`, अभियांनाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात काम चालू आहे. जगभरातील इतर देशांसमोर भारतातील खनिकर्म मंत्रालयाचे काम आदर्शवत असल्याचे मत या निमित्ताने दानवे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. यावेळी दानवे यांच्या हस्ते इंडियन पॅव्हिलियनचे उदघाटन देखील करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.