Ambadas Danve-Sanjay Shirsat News Sarkarnama
मराठवाडा

Danve On Shirsat News : मंत्रीपद न मिळाल्याने माणूस बिथरलाय ; ठाकरेंविरोधात बोलणे हीच त्यांची दुकानदारी..

Shivsena (UBT) : एव्हाना राजकारणी म्हणून नीच आहात पण आता, माणूस म्हणून ही तुम्ही हीच लंपट भुमिका वठवताय !

सरकारनामा ब्युरो

Marathwada : राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर चंद्रकांत खैरे यांचा हवाला देत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली होती. (Danve On Shirsat News) यावरून राजकारण पेटले असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.

शिरसाट- खैरे यांच्यात कलगीतुरा सुरू असतांना दानवे यांनी या वादात उडी घेत (Sanjay Shirsat) शिरसाट यांना सुनावले आहे. ` मंत्रीपद न मिळाल्याने माणूस बिथरलाय`, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. (Shivsena) मंत्रीपद न मिळाल्याने माणूस बिथरलाय म्हणून काय बोलायच समजतं नाही. संजय शिरसाट तुम्ही दररोज मीडिया समोर येऊन विष्ठा टाकताय, हल्ली फक्त ठाकरे घराण्यावर बोलण हीच आपली दुकानदारी आहे !

एव्हाना राजकारणी म्हणून नीच आहात पण आता, माणूस म्हणून तुम्ही हीच लंपट भुमिका वठवताय ! अशा शब्दात दानवे यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. (Marathwada) ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या हिंदी भाषी मेळाव्यात खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर कडाडून हल्ला चढवला होता.

त्याला प्रत्युत्तर देतांना शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांचे सौदर्य पाहून खासदारकी दिली होती, अशी टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा हवाला देत केली होती. त्यावर खैरे यांनी देखील शिरसाटांना सुनावत आपण बोललो काय होतो ? आणि शिरसाट काय सांगतायेत, असे म्हणत प्रत्युत्तर दिले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT