Kirit Somaiya -Ambadas Danve News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Kirit Somaiya : सोमय्यांच्या अठरा पानी नोटिशीला दानवेंचे बावीस पानी उत्तर...

Shivsena Political News : सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता.

Jagdish Pansare

Aurangabad Political News : संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या किरीट सोमय्या यांच्या नग्न व्हायरल व्हिडिओ प्रकरणात काही दिवसांपूर्वी मला किरीट सोमय्या याने अवमानाची नोटीस पाठवली होती. (Opposition Leader Ambadas Danve) या नोटीसला माझे वकील शुभम काहिटे यांच्या मार्फत सविस्तरपणे २२ पानांचे कायदेशीर उत्तर आज दिले असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

या संदर्भात दानवे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. (BJP) भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या गेल्या महिन्यात गुपचूप छत्रपती संभाजीनगरात येऊन गेले. या वेळी त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना अवमान नोटीस पाठवल्याचे समोर आले होते. (Shivsena) सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानच हा व्हिडिओ समोर आल्याने किरीट सोमय्या चांगलेच अडचणीत आले होते.

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात सभागृहात निवेदन करावे लागले होते. दानवे यांनीदेखील या आक्षेपार्ह व्हिडिओचा पेनड्राइव्ह उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे देत कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी (Kirit Somaiya) सोमय्या यांनी अंबादास दानवे यांना अवमान नोटीस पाठवली होती. १८ पानांच्या या नोटिशीला आता दानवे यांनी आपल्या वकिलांमार्फत २२ पानी उत्तर पाठवले आहे.

सोमय्या १९ आॅगस्ट रोजी ज्या विमानाने मुंबईतून संभाजीनगरात आले होते, त्या विमानातून दानवेदेखील आले होते. या वेळी विमानतळावर समोरासमोर आल्यानंतर सोमय्या यांनी दानवेंना नोटीस पाठवल्याचे सांगितले होते. या संदर्भात जी काही कायदेशीर प्रक्रिया असेल ती आपण करू, असे दानवे यांनी स्पष्ट केले होते. नोटिशीला घाबरणार नाही, मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही दानवे यांनी सांगितले होते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT