Pankaja Munde Dasara Melava 2023  Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde Dasara Melava 2023 : माझा आवाज कोणी दाबू शकत नाही : पंकजा मुंडेंचा भाजपला इशारा ?

Datta Deshmukh

Beed Politcal News : सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आले. मेळाव्याप्रसंगी त्या बोलण्यास उभ्या राहिल्या अन् उपस्थित नागरिकांना त्यांचा आवाज ऐकू येत नाही, असे म्हणताच त्यांनी उपस्थितांना हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. हा त्यांचा दरारा वाटत असला तरी त्यामध्ये मायेचा व आपुलकीचा ओलावा होता.

मंगळवारी दसरा मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी भगवानबाबांचे दर्शन, आरती, पूजन केले. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे या तिघी बहिणी एकत्र आल्या होत्या. त्यांचे सावरगाव येथे नागरिकांनी जंगी स्वागत केले. गावोगावी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आली.

पंकजा मुंडे म्हणालया, माझ्या कारखान्यावर छापे टाकले. तेव्हा तुम्ही कोट्यधी रुपये केवळ दोन दिवसांत जमा केले. मी हरले तरी मी तुमच्या नजरेतून कधी उतरले नाही. तुमचे उपकार फेडणे अशक्य आहे. तुम्ही उन्हात आहे, तर मी पण उन्हात आहे. त्यामुळे येत्या काळात

मला सत्तेपासून दूर ठेवा, पण माझ्या कार्यकर्त्याना दूर ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. येत्या काळात शेतकरी, शेतमजूर व ऊसतोड कामगारांना न्याय मिळाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. सभेत अनेकवेळा व्यत्यय येत होता. मात्र, त्यांचा आवाजाचा अडथळा निर्माण होत होता. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी काहीच न बोलता सत्ताधारी मंडळींना फटकारले.

राज्यभरात परिक्रमा यात्रा काढली, त्यावेळी मला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी जनतेचे आभार मानते. तुम्ही विश्वास दाखवला त्यामुळे मी भारावून गेले आहे. नागरिकांच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही. त्यामुळे मी प्रत्येकास न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT