MLA Amol Mitkari Sarkarnama
मराठवाडा

Buldhana Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आमदार मिटकरी संतापले; म्हणाले, 'आरोपीचा 'एन्काऊंटर' करा'

DCM Ajit Pawar NCP party MLA Amol Mitkari encounter tribal community Buldhana : बुलढाणा इथं चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे आमदार अमोल मिटकरी यांची मोठी मागणी.

Pradeep Pendhare

Mumbai News : बुलढाणा इथं आदिवासी समाजातील चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या चिमुरडीवर 21 वर्षाच्या युवकाने अत्याचार केला असून, तो मुलीचा चुलत नात्याने काका आहे.

चिमुरडीची प्रकृती चिंताजनक असून, तिला 40 टाके पडले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात येत पीडित मुलीची भेट घेतल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, "घटना अतिशय गंभीर, चिड आणणारी आणि संतापजनक अशीच आहे. चिमुरडीवर जनावरांच्या गोठ्यात नेत अत्याचार केला आहे. त्यात तिची प्रकृती गंभीर आहे. तिला 40 टाके पकडले असून, तिच्या जीवाला धोका कायम आहे. तिच्याबरोबर नातेवाईकाने हे कृत्य केले आहे. बुलढाणा पोलिसांनी (Police) त्याला अटक केली आहे. परंतु मी गृहमंत्र्यांकडे अशा नराधमाचा एन्काऊंटर करण्याची मागणी करणार आहे".

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी रुग्णालयात जात पीडित मुलीच्या कुटुंबीयांची विचारणा केली. हे अत्याचाराच प्रकरण अतिशय गोपनीय ठेवण्यात आलं आहे. पीडित मुलीचे प्रकृती सुधारणा व्हायला, जवळपास दीड महिना लागणार असल्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी एन्काऊंटर हाच पर्याय आहे, त्यासाठी आपण गृहमंत्र्यांचे लक्ष वेधणार आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेवर आमदार मिटकरींनी तीव्र संताप व्यक्त केल्याने या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे.

बलात्कार करून खून, घटनेच्या निषेधार्थ शहर बंद

जतमधील करजगी इथं चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करत खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज सर्व समाजाकडून बंद पुकारण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दुपारी जतमध्ये मोर्चा काढण्यात आला. कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT