Minister Nitin Raut Sarkarnama
मराठवाडा

वीज खंडीत करण्याचे फसवे संदेश; ऊर्जा मंत्र्यांच्या आदेशानंतर तक्रार दाखल

महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे. (Minister Nitin Raut)

सरकारनामा ब्युरो

मुंबई - वीज देयकाच्या थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने तातडीने संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा, (Mahavitaran) अशा स्वरूपाचे बनावट संदेश पाठवले जात आहे. (Nitin Raut) असे संदेश पाठवून वीज ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. (Maharashtra)

अशी फसवणूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी कार्यवाही करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आज दिले.

त्यानंतर तातडीने पावले उचलत महावितरणने मुंबई आणि महाराष्ट्र सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महावितरणच्या नावाने वीज ग्राहकांची अशा पध्दतीने दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे.

महावितरणची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका यावेळी डॉ. राऊत यांनी घेतली. अशा फसव्या संदेशांना बळी पडू नका, असे आवाहनही राऊत यांनी ग्राहकांना केले.

केवळ महावितरणच्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्र आणि अधिकृत ऑनलाइन पेमेंट गेट वे च्या माध्यमातूनच विज बिल भरावे . याशिवाय सर्व ग्राहकांनी आपले थकित बिल भरून महावितरणला सहकार्य करावे,अशी विनंती यानिमित्ताने राऊत यांनी ग्राहकांना केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT