मराठवाडा

देगलूर -बिलोली पोटनिवडणूक : कॉग्रेसचे जितेश अंतापूरकर आघाडीवर

पहिल्या फेरीपासून काँग्रेस महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे आघाडीवर आहेत.

सरकारनामा ब्युरो

नांदेड: देगलूर -बिलोली पोटनिवडणुकीच्या (Deglaur Biloli election) मतमोजणीला आज सुरुवात झाली. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत या निवडणुकीत झाली होती. आज मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हा पहिल्या फेरीपासून काँग्रेस महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) हे आघाडीवर आहेत.

आठवी फेरी पूर्ण झाली तेव्हा कॉग्रेसचे जितेश अंतापूरकर यांना 33, 068, भाजपचे सुभाष साबणे यांना 22, 486, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तम इंगोले यांना 3022, कांग्रेस चे जितेश अंतापूरकर 10, हजार 583 मतांनी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीपासून अंतापूरकर यांनी भाजपचे सुभाष साबणे यांच्यावर आघाडी घेतली.

तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले हे आहेत. तिसर्‍या फेरीअखेर अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांच्यावर ३२६४ मतांची आघाडी घेतली होती. वंचित बहुजन आघाडीला मत म्हणजे भाजपला मत, असे सांगत नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मतदारांना यावेळी फाटाफूट नको असे आवाहन केले होते.

त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. वंचितच्या उत्तम इंगोले यांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही.त्यामुळे काँग्रेसला यावेळी फायदा होताना दिसत आहे..

या पोटनिवडणुकीला मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आजच्या मतमोजणीमध्ये कोण बाजी मारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. लोकसभेच्या ३ आणि सर्व राज्यांसह २९ विधानसभा जागांवर मतमोजणीची होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष देगलूर-बिलोली आणि दादरा नगर हवेलीच्या मतमोजणीकडे सर्वाधिक लागले आहे.

महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली येथे विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला. भाजपकडून शिवसेनेतून आलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जितेश अंतापूरकर उमेदवार असले तरी काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT