Dharashiv Congress Politics News Sarkarnama
मराठवाडा

Dharashiv Congress Politics : मधुकर चव्हाणांच्या मदतीला लातूरचे देशमुख; कारखानदारीतून काॅंग्रेसला बळ मिळणार...

Congress Political News : मांजराच्या एन्ट्रीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.

Jagdish Pansare

Marathwada Political News : मांजरा साखर उद्योग समूहाच्या माध्यमातून देशमुख कुटुंबाने काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांच्या तुळजापूर मतदारसंघातील एक कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. (Congress News) देशमुखांची ही साखर पेरणी भाजपने घुसखोरी केलेल्या येथील काँग्रेसलाही बळ देणारी ठरणार आहे. या भागामध्ये तुळजाभवानी कारखाना असून, तो स्वतः चव्हाण यांच्या सुपुत्राकडेच आहे. शिवाय आता कंचेश्वरसुद्धा अप्रत्यक्षरित्या चव्हाण याच्याशी संबंधित असणार आहे.

तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील कंचेश्वर साखर कारखाना देशमुख परिवाराने चालविण्यासाठी घेतला आहे. (Factory) काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी यांना त्याचा चांगलाच आधार मिळणार आहे. मांजराच्या एन्ट्रीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल या अपेक्षेने त्यांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. (Congress) तुळजापूर मतदारसंघ काॅंग्रेसचा पारंपरिक गड २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडे गेला. यामुळे मधल्या काळात सर्वच ठिकाणी भाजपचा बोलबाला सुरू झाला व काँग्रेस बॅकफूटवर गेली.

मधुकरराव चव्हाण यांच्या वयाचा विचार करता ते अधिक सक्रिय राहणे काहीसे कठीण असले तरी त्यांचा वावर दुर्लक्ष करण्याइतका नक्कीच नाही. (Marathwada) दुसऱ्या बाजूला त्यांचे पुत्र सुनील चव्हाण यानी तालुक्यातील तुळजाभवानी कारखाना स्वतःकडे ठेवून काही अंशी या भागात आपला जम कायम राखण्यात यश मिळविले. अनेक वर्षांपासून तुळजाभवानी कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना अगदी सोलापुरात ऊस द्यावा लागला होता.

गेल्यावर्षी तुळजाभवानी कारखान्याने गाळप करण्यास सुरुवात केली, याचे व्यवस्थापन गोकुळ समूहाकडे असले तरी सुनील चव्हाण यांच्याकडेच त्याची सूत्रं आहेत. कंचेश्वर कारखाना येथील शेतकऱ्यांना दुसरा चांगला पर्याय निर्माण करून देण्यात यशस्वी ठरला आहे. यंदा कारखाना भाड्याने देण्याचा निर्णय व्यवस्थापनाकडून घेतला गेला आहे. त्यात कारखानदारीत नावाजलेल्या मांजरा समूहाने कारखाना घेतल्याने शेतकऱ्यांतून स्वागत होत आहे.

तेरणा कारखाना घेण्यासाठी शेवटपर्यंत या समूहाने संघर्ष केला होता, मात्र दोन वर्षांच्या न्यायिक लढाईनंतरही कारखाना त्यांना मिळू शकला नाही. जिल्ह्यामध्ये त्यांना उद्योगाबाबत विस्तार करायचा मानस असल्याचे त्यावेळीच स्पष्ट झाले होते. शेवटी हा मानस त्यांनी कंचेश्वरच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. तुळजापूर तालुक्यासह धाराशिव सीमेवरील धाराशिव, लोहारा तालुक्यांतील शेतकऱ्यांना चांगला पर्याय निर्माण होणार आहे.

राजकीयदृष्ट्या याकडे पाहिल्यास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांना देशमुख परिवाराचा चांगला आधार मिळणार असे चित्र आहे. कै. विलासराव देशमुख यांच्यापासून मधुकरराव चव्हाण यांचे अत्यंत जवळचे संबंध राहिले आहेत. पुढे अमित देशमुख व चव्हाण यांच्यातही ऋणानुबंध घट्ट आहेत. कारखान्याच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांना चव्हाण कंचेश्वर (मांजरा) च्या माध्यमातून न्याय देऊ शकतात. तुळजाभवानी व कंचेश्वर तालुक्यातील दोन कारखाने अप्रत्यक्षरित्या चव्हाण यांच्याशी संबंधित असल्याने काँग्रेसला चांगलाच आधार मिळणार असल्याचे बोलले जाते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT