Devendra Fadanvis News, Latur
Devendra Fadanvis News, Latur Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadanvis News : माझा जन्म नागपूरचा, पण निलंग्याने पुनर्जन्म दिला ; फडणवीस अस का म्हणाले ?

राम काळगे

Marathwada : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बऱ्याच वर्षांनी निलंग्यात आले होते. माजी मुख्यमंत्री दिवगंत डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात फडणवीसांनी सहा वर्षापुर्वी घडलेल्या एका दुर्घटनेचा उल्लेख केला. माझा जन्म नागपूरचा आहे, पण निलंग्यात माझा पुनर्जन्मच झाला, असे ते म्हणाले.

तेव्हा झालेल्या हेलीकाॅप्टर दुर्घटनेत हेलीकाॅप्टर नष्ट झाले, पण माझ्या अंगावर ओरखडा देखील आला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने तेव्हा माझा पुनर्जन्मच झाला असे फडणवीस म्हणाले. २५ मे २०१८ रोजी (Latur) लातूरातून एक कार्यक्रम आटोपून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे हेलीकाॅप्टरने मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यासोबत सहाजण होते, निलंगा तालुक्यातील शिवाजी मैदानाजवळ त्यांच्या हेलीकाॅप्टरला अपघात झाला होता.

फडणवीस यांच्याबाबतीत हेलीकाॅप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, इमर्जन्सी लॅन्डींग, विमानाचे ऐनवेळी उड्डाण रद्द करावे लागणे, असे प्रकार अनेकदा घडले. हेलीकाॅप्टर दुर्घटनेतून तर एकदा नव्हे तर दोनदा बचावले. आज निलंग्यात आल्यानंतर त्यांना सहा वर्षापुर्वी जेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा घडलेल्या आणि थरकाप उडवणाऱ्या हेलीकाॅप्टर दुर्घटनेची आठवण झाली.

२५ मे २०१८ रोजी लातूरातून एक कार्यक्रम आटोपून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हेलीकाॅप्टरने मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यासोबत सहाजण होते, निलंगा तालुक्यातील शिवाजी मैदानाजवळ त्यांच्या हेलीकाॅप्टरला अपघात झाला होता. मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी गर्दी जमलेली असतांना हेलीकाॅप्टर धूळ उडवत उडाले.

नंतर अचानक ते जवळच्या झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. यात काही नागरिक देखील जखमी झाले होते. पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली होती. या अपघातात हेलीकाॅप्टरचे मोठे नुकसान झाले, पण फडणवीसांसह इतरांना कुठलीही इजा झाली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT