Old Pension Scheme News, Devendra Fadnavis
Old Pension Scheme News, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadanvis : जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे प्रश्न हे काॅंग्रेस-राष्ट्रवादीचे पाप, ते आम्ही सोडवू...

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : येणाऱ्या तीन महिन्यात सरकार तब्बल तीस हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. औरंगाबाद येथे भाजप-युतीचे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील (Kiran Patil) यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. तसेच जुनी पेन्शन योजना देण्याची धमक फक्त आमच्या सरकारमध्येच असल्याचेही फडणवीस म्हणाले.

जूनी पेन्शन योजना व इतर शिक्षकांचे जे प्रश्‍न निर्माण झाले आहेत ते (Bjp)भाजप किंवा शिंदे गटाच्या शिवसेनेने निर्माण केलेले नाहीत. तर (Congress) काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारचे हे पाप आहे. ते आम्ही सोडवत असून शिक्षकांच्या अनुदान, पेन्शन संदर्भात या सरकारने नुसत्याच घोषणा केल्या होत्या. हे सर्व सोडविण्याची धमक फक्त आमच्यातच असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

२०१२ पासून बंद असलेली शिक्षक भरती आम्ही सुरु केली असून आगामी तीन महिन्यात ३० हजार जागा भरण्यात येणार आहेत. शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. मोदी सरकार नवीन शिक्षानिती आणत आहे. यामुळे अमुलाग्र बदल होतील, हे शिक्षण वैश्‍विक पध्दतीन होईल, जगाला लागणारे मानव संसाधन आपण निर्माण करु शकु. जूनी पेन्शन आणि अनुदान हे प्रश्‍न काँग्रेस-राष्‍ट्रवादीने निर्माण केलेले आहेत.

२००५ मध्ये या सरकारने जुनी पेन्शन बंद करून नवीन केली. त्यानंतर पुन्हा २०१० मध्ये नवीन पेन्शन आणली. त्यानंतर २०१९ पर्यंत कोणीच या पेन्शन विषयी बोलले नाही. आता आमचे सरकार आल्यानंतर जुनी पेन्शन वर बोलू लागेल. या संदर्भात मागणी मांडून व्हिडीओ व्हायरल करीत शिक्षकांची सहानभूती मिळवत आहे. मात्र या सरकारने त्यांच्या कार्यकाळात एकदाही जून्या पेन्शनची मागणी केली नाही. आता हे लबाडी करू लागले आहेत, असा आरोपही फडणवीसांनी केला.

या पोपटांना आता उत्तर विचारण्याची वेळ आली आहे. आम्ही जून्या पेन्शन विरोधात नाही, ती देण्याची ताकद आमच्यातच आहे. तसेच अनुदानाचा प्रश्‍नही मार्ग लागला आहे. या संदर्भात अकराशे कोटींची तरतूद पुरवणी मागण्यात केली आहे. आम्ही कोणताही निर्णय प्रोसेजरने करतो हे जीआरच्या नावाने ओरडणाऱ्यांनी ओळखावेत, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT